शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

एका महिन्यात १० हजार बुकिंग्स; लाँचपूर्वीच Volkswagen च्या SUV नं केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 7:23 PM

Volkswagen पुढील आठवड्यात SUV लाँच करणार आहे. ग्राहकांकडून या कारला लाँच पूर्वीच उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

ठळक मुद्देVolkswagen पुढील आठवड्यात SUV लाँच करणार आहे. ग्राहकांकडून या कारला लाँच पूर्वीच उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

जर्मनीची कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगन (Volkswagen) आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही Volkswagen Taigun 23 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच करणार आहे. ही एसयुव्ही लाँच होण्यापूर्वीच या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने 18 ऑगस्टपासून या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचं बुकिंग सुरू केलं होतं. परंतु आता carandbike च्या अहवालानुसार, Volkswagen Taigun चा 10 हजारांपेक्षाही प्री-ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

Volkswagen ब्रांडचे बोर्ड मेंबर फॉर सेल्स, मार्केटिंग आणि आफ्टर सेल्स Klaus Zellmer यांनी याबाबत खुलासा केला. "भारतात दर महिन्याला Volkswagen Taigun च्या 5 ते 6 हजार युनिट्सची विक्री करण्याचं आमचं लक्ष्य आहे. परंतु आम्हाला लाँचपूर्वीच 10 हजार प्री बुकिंग्स मिळाल्या आहेत. Taigun ही Volkswagen समुहाचं पहिलं मॉडेल आहे जे India 2.0 स्ट्रॅटेजी अंतर्गत MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलं आहे," अशी माहिती त्यांनी एका विशेष संभाषणादरम्यान दिली.

काय आहेत फीचर्स?एसयूव्हीच्या टॉप-स्पेक जीटी व्हेरिअंटमध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी डे टाईम रनिंग लाईट्स, 17-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. कारच्या इंटीरियरमध्ये 10-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये असतील. सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसयूव्ही 3-पॉइंट सीटबेल्ट, ISOFIX माउंट, रिअर पार्किंग कॅमेरा, ABS आणि सर्व प्रवाशांसाठी 6 एअरबॅग्सही देण्यात आल्या आहेत. ही कार Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.

ही कार दोन प्रकारच्या इंजिन ऑप्शनसह येणार आहे. यामध्ये 1.0 लीटर TSI आणि 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड इंजन का आउटपुट 113 PS आणि 175 Nm इतकं आहे. हे इंजिन  6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसोबत येतं. 1.5 लीटर TSI पेट्रोल 148 bhp ची पॉवर आणि 250 Nm का टॉर्क जेनरेट करतं. या इंजिनसोबत  6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीएसजी ट्रांन्समिशनचा ऑप्शन मिळतो. 

टॅग्स :Volkswagonफोक्सवॅगनcarकारIndiaभारतHyundaiह्युंदाई