मेघना ढोके. ‘लोकमतसखी.कॉम’च्या संपादक आहेत. पत्रकार-अनुवाद-लेखक अशी त्यांची ओळख. २५ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. कॉन्फ्लिक्ट रिपोर्टिंग’ हा त्यांच्या वार्तांकनाचा विषय आहे. रिपोर्ताज शैलीत सामाजिक विषयावर संशोधनपर लेखन करतात. याशिवाय क्रिकेट, खाद्यसंस्कृती आणि सिनेमासह पॉप्युलर कल्चरचे सामाजिक परिणाम हे त्यांच्या आवडीचे विषय. आसाम एनआरसीविषयी त्यांनी लिहिलेले ‘मोई कुन? आमी कुन?’ हे पुस्तक गाजले आहे. अरुण साधू शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीन यासंदर्भात लिहिलेल्या ‘जो है, वो है,’ या लेखाला आशिया-पॅसिफिक स्तरावरचा एशियन डेव्हलपमेण्ट बॅँकेचा ‘बेस्ट डेव्हलपमेण्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणजेच ‘डाजा’ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसाठी जपान-टोक्यो येथील कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी विशेष फेलोशिपही मिळाली होती. तसेच अमेरिकन सरकारची ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्रॅम’ ही विशेष फेलोशिपही मिळालेली असून त्याअंतर्गत ‘मीडिया आणि डेमोक्रसी’ याविषयावरचा अभ्यास त्यांनी केला आहे. पां. वा. गाडगीळ विकासात्मक लेखन पुरस्कारही अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. म्हणूनही त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. आय ॲम अ टॅक्सी, सॅक्रेड लीफ, फेलानी, डेमोक्रॅसीज इलेव्हन-भारतीय क्रिकेटची महान गाथा ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत.Read more
Family News : आयपीएलची मॅच चालू असताना विराट कोहलीने खाणाखुणा करत दूर स्टॅण्डमध्ये उभ्या असलेल्या गर्भवती पत्नी अनुष्का शर्माला ‘जेवलीस का’? - असं विचारल्याचा व्हिडिओ दोनच दिवसांपूर्वी तुफान व्हायरल झाला. ...
महेंद्रसिंह धोनी निवृत्त झाला, भारतीय क्रिकेटचं रंगरूप ज्यानं बदलून टाकलं, तो धोनी ! असं काय आहे त्याच्याकडे, की तो जितका समरसून जगला, लढला-जिंकला-तितकाच अलिप्तही राहू शकला? ...
सोनाली मुजुमदार आणि सुमंथ मारुजो. अमेरिकाज गॉट टॅलण्टच्या ऑडिशनची व्हिडीओ क्लिप रिलीज झाली आणि त्यांच्या ‘बॅड सालसा’नं जगभरातले लोक दिवाने झाले. शोधू लागले की ही मुलं कोण? कुठली? हे असे बेफाम वेगवान नृत्य शिकली कुठून? नेमकी आहे काय त्यांची गोष्ट? ...
धारावीतले रॅपर्स, हिपहॉपर्स, बिट बॉक्सर्स, बी बॉयर्स.. धारावी त्यांचा श्वास. ते म्हणतातही, मेरे हूड जैसा कुछ नहीं. पण आता कोरोनाने नुसतं त्यांचं जगणं लॉकडाऊन केलं नाही तर काहींचे शब्दही गोठलेत. काहीजण तर सोशल मीडियातून आपल्या कलेतून पैसा उभारत आजूबा ...