ठळक मुद्देपॅशन आणि पेशन्स

मुलाखती आणि शब्दांकन - मेघना ढोके, सचिन भोसले, सोमनाथ खताळ, प्रगती जाधव-पाटील

 

आपल्या सर्वोत्तम खेळाचं एक प्रतीक असतं. तिथून पुढे ध्यास असतो तो अत्युत्तमाचा, जगात सर्वोत्तम होण्याचा. परफेक्शनचा.
त्याच ध्यासापायी रात्रंदिवस सराव करणारे तरुण खेळाडूही टाळेबंदीत अडकले.
जिवाचं रान करून ज्यांनी ऑलिम्पिक तिकीट कमावलं त्यांना कळलं की, ऑलिम्पिकच आता वर्षभर पुढे ढकलण्यात आलं आहे.
त्यानंतर काय झालं त्या खेळाडूंचं? फुल चाज्र्ड असलेली आपली ताकद कशी वापरली आणि कसं जमवून घेतलं त्यांनी अपेक्षाभंगाशी, निराशेशी आणि लॉकडाऊनशी? तेच सांगणारा हा संवाद नऊ उत्कृष्ट भारतीय खेळाडूंशी..

बॉक्सर लोवलीना बोरगोहीन


आसामच्या गोलाघाटची लोवलीना. 22 वर्षाची. वडील शेतकरी, लहानमोठं दुकान चालवतात. दोन मोठय़ा जुळ्या बहिणी, त्याही बॉक्सर. मात्र त्या नॅशनल लेव्हलच्या पुढे मजल मारूशकल्या नाहीत.
लोवलीना मात्र बॉक्सर, अशी जिद्दी की थांबणं तिच्या स्वभावातच नाही. 2क्18 आणि 2क्19 मध्ये तिनं सलग ब्रॉन्झ पदक जिंकलं. टोक्यो ऑलिम्पिकचं पात्रता तिकीटही तिला मिळालं. मात्र ती खूश नव्हती, तिच्याच भाषेत सांगायचं तर ती म्हणते, ‘मेडल तो मै लाया, लेकीन परफॉर्म अच्छा नहीं किया मैने मन में बोल दिया था की, जो हो ऑलिम्पिकमें गोल्ड लाने का, और कुछ नहीं सोचनेका.’
- ऑलिम्पिक हे एकच लक्ष्य तिच्यासमोर होतं. हायपर ट्रेनिंगही सुरूहोतं. ऑलिम्पिकपूर्वी तिची नजर होती ती वल्र्ड चॅम्पिअनशिपवर. ते पदक जिंकून तिला ऑलिम्पिकच्या दिशेनं जायचं होतं. मात्र ती स्पर्धाही रद्द झाली, आणि ऑलिम्पिकही पुढे ढकलण्यात आलं.
लोवलीना आपल्या गावी घरी परत गेली, आणि मग पुढे.

लोवलीना सांगते..
क्वॉलिफाय कर लिया इसका खुशी था, वल्र्ड चॅम्पिअनशिप के मेडल भी लाया मगर मुङो मालूम था मेरा परफॉर्मन्स खराब था ! माङया अपेक्षेनुसार मी खेळले नव्हते, मला ती रुखरुख होती आणि वाटत होतं की आता गोल्डशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही. त्यानुसार मी तयारी सुरूकेली. ट्रेनिंग लेव्हल हाय होती. जास्तीत जास्त ट्रेनिंगच करत होते. आणि मग एकदम ब्रेक लागला. पुढे काय असा प्रश्न होताच.
हायपॉवर ट्रेनिंग जास्त काळ नाही करूशकत. मी घरी आले. घरात माङया फिटनेस ट्रेनिंगची साधनं आहेत. त्यावर मी सराव करत राहिले. पण फार सरावही नाही करता येत, इंज्युरीची भीती असते. म्हणजे इंज्युरीपण व्हायला नको आणि स्लोही व्हायला नको असं सगळं बॅलन्सिंग सुरूझालं.
घरी राहायची सवयच नव्हती. फ्री टाइम नावाची गोष्टच नव्हती आयुष्यात. दोन-तीन महिने मी घरीच आहे. बॉक्सिंगचे व्हिडिओ पाहतेय सलग, अॅनालिसीस, करेक्शनही करतेय. भात लावणीही सुरूझाली, मग पापांबरोबर मी लावणीलाही गेले. घरी आई खूप आजारी होती, त्यामुळे आता बरंही वाटतं आहे की, मला स्वयंपाक , तिची देखभाल हे सगळं नीट करता आलं. गावात माङया नदी वाहते छान, तिथं जाता येतं, बसता येतं. घरच्या माणसांबरोबर काही काळ तरी राहता आलं.
आता पुढची स्पर्धा जाहीर झाली की पुन्हा नव्यानं नव्या तयारीला लागायचं.
यहीं लाइफ है. पॉङिाटिव्ह मोड में रहना है बस!

शूटर अंजुम मोडगिल

अंजुम चंदीगडची. भारताची 50 मीटर 30 पी मधली नंबर एक खेळाडू, तर 1क् मीटर एअर रायफलमध्ये जागतिक क्रमवारीत दुसरी.
2016 पासून ती सातत्यानं आंतरराष्ट्रीय पदकं जिंकते आहे. 2क्19मध्ये तिला भारत सरकारचा मानाचा अजरुन पुरस्कारही मिळाला. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या काही मोजक्या खेळाडूत अंजूमचा समावेश होतो.
ऑलिम्पिकचं टार्गेट तिच्याही अगदी डोळ्यासमोर होतं. मात्र शूटिंगचा वर्ल्डकप आधी रद्द झाला आणि ऑलिम्पिकही पुढे ढकलण्यात आलं. मात्र ती हसून सांगते, ‘अच्छा है ना कॅन्सल तो नहीं हुआ, पोस्टपोनही तो हुआ है, जो भी हुआ मैने पॉङिाटिव्हलीही लिया.’
हे असं सगळं पॉङिाटिव्हली घेण्याची ताकद आणि मानसिकता नेमकी आली कशी?

अंजुम  सांगते.
हमारा सबकुछ एकदम फिक्स था, सेडय़ुल बना हुआ था, सामने वर्ल्डकप था.. आणि मग एकदम ब्रेक लागला. मी घरी आले. घरी आल्यावर काय करायचं याचं काहीच रूटीन नव्हतं. करायचं काय? त्यावेळी मी स्वत:ला सांगितलं की, यासा:यातही मला चॉइस आहे की, जे आहे ते पॉङिाटिव्हली घेऊन आता पुढे काय हे आपण ठरवायचं की चिडचिड करत बसायची? मी अर्थात पहिला पर्याय निवडला. एरव्ही आमचा सगळा फोकस हा ट्रेनिंग, कॉम्पिटिशन, पॉवर गेम यावरच असतो. मी ठरवलं हा जो काही मोकळा वेळ मिळाला आहे तो रिकव्हरी टाइम आहे. गेमच्या पलीकडे आता फोकस करू.
एरव्ही डोक्यात सतत शूटिंगच असतं त्याऐवजी मी दुस:या गोष्टी करून पहायचं ठरवलं. उदासपणो नाही, पॉङिाटिव्हली. मी घरातच कुकिंग शिकले. माझी एक बहीण नृत्य शिकवते, तिच्याकडे नृत्याचे धडे नियमित गिरवले. ऑनलाइन पाहून वेगवेगळे वर्कआउट करून पाहिले. फिजिओलॉजीचे काही ऑनलाइन कोर्सेसही केले. आणि मुख्य म्हणजे पेंटिंग. मला चित्र काढायला आवडतात. मी भरपूर चित्र काढली, माङया मनात आहे की त्यांचं प्रदर्शन-विक्री यातून काही निधी उभारून तो गरजूंना द्यावा. एकच एक विचार क रत न बसता मी फिजिकली, मेंटली फिट राहण्यासाठी व्यायाम करण्यासोबत अनेक गोष्टी लॉकडाऊनमध्ये केल्या.
आता पुढची कोणती स्पर्धा ऑलिम्पिकपूर्वी खेळणार, त्यासाठी तयारी काय लागेल, कोच काय नवीन प्लॅन करतील हे सगळं नव्यानं करावं लागणार आहे. त्यामुळे यावेळी मनात एकच आहे, आपण आपल्या बेस्ट फॉर्ममध्ये राहायचं.

तिरंदाज अतानू दास

अतानू हा जागतिक कीर्तीचा तिरंदाज. व्यक्तिगत आणि सांघिक खेळातही त्यानं आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहेत.
लॉकडाऊन सुरूझालं तेव्हा तो पुण्यातल्या कॅम्पमध्ये होता. दोन वर्षापूर्वी त्याचा आणि जागतिक तिरंदाज दीपिका कुमारीचा साखरपुडाही झाला. मात्र ऑलिम्पिक झालं की लगA, असं म्हणत दोघांनीही पूर्णवेळ खेळावरच लक्ष्य केंद्रित केलं होतं. मात्र ऑलिम्पिक पुढे सरकलं, आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. जूनमध्ये रांचीत त्यांनी लगAही केलं.

अतानू सांगतो
हम सोच रहे थे की अब बिलकूल रेडी है, बस जाके खेलना है.
पण तसं झालं नाही. मध्येच ही महामारी आली. लांबलचक ब्रेक घ्यावा लागला. त्यापूर्वी डोक्यात फक्त ट्रेनिंग, प्रॅक्टिस, टुर्नामेण्ट हेच विषय होते. कॅम्पमधून बाहेर पडल्यावर विचार केला की आता पुढे काय?
याकाळातही डोक्यात हेच आहे की फिजिकल फिटनेस, मेण्टल फिटनेस महत्त्वाचा. आम्ही घरातही प्रॅक्टिस करतोच मात्र त्याला मर्यादा आहे. जेमतेम 10 मीटरचा सराव घरात करता येतो. त्यामुळे थोडा सराव, योग, रोज सकाळ-संध्याकाळ तासभर तरी सगळं रूटीन लावणं हे सगळं करतोय.
बाकी घरकामही करतो. डोक्यात हेच आहे की, आता ब्रेक असला तरी आपण ट्रॅकवर राहायचं, आऊट व्हायचं नाही.

तिरंदाज दीपिका कुमारी

झारखंड, रांचीची दीपिका कुमारी. अतिशय खडतर परिस्थितीतून  दोनवेळा ऑलिम्पिक क्वॉलिफाय करण्यार्पयतचा तिचा प्रवास सोपा नव्हताच. तिनं आजवर 23 वर्ल्डकप मेडल्स, राष्ट्रकुल स्पर्धेतलं पदक असं सारं जिंकत नव्यानं आपली भिस्त ऑलिम्पिकवर ठेवली होती. त्यासाठी लगAही पुढे ढकललं होतं.
मात्र तसं झालं नाही. लगA करण्याचा निर्णय लॉकडाऊनमध्येच घेतला आणि  एक नवीन रूटीन सुरूझालं.

दीपिका सांगते.
मिस तर करतेच, करणारच ना ! वेगळ्या ट्रॅकवर फोकस्ड होतो आम्ही. आता जेव्हा केव्हा सारं सुरूहोईल, तेव्हा आम्हालाही सगळं नव्यानं सुरूकरावं लागणार आहे. प्रॅक्टिस तर असतेच. पण स्पर्धेप्रमाणो, त्या त्यावेळची तयारी वेगळी असते. फोकस्ड असतो आपण.
आता फिजिकल-मेण्टल फिटनेसवर फक्त काम करतेय. जी प्रॅक्टिस आम्ही कॅम्पमध्ये करतो ती घरी नाही होऊ शकत.
त्यात कॉम्पिटिशन असते, तेव्हा आपल्याला कळतं की आपलं चुकलं कुठं? काय मिस केलं, मग लगेच त्यावर सुधारणा होतात. त्यावर काम केलं जातं. आता कॉम्पिटिशनच नाही, त्यामुळे मग रूटीन सराव फक्त आहे.
‘बोअर तो होही रहे है !’ घरात रहायची मला अजिबात सवय नव्हती. त्याच्याशी जुळवून घेतेय. मुख्य म्हणजे आमचा पॉवर-फोकस्ड गेम असतो, त्यावेळी बाकी दुसरं काही नाही. जेव्हा नव्यानं सारं सुरूहोईल तेव्हा नव्यानं सारं करणं ही खरोखरच नवीन सुरुवात असते. ती तर करावीच लागेल..

 


वेटलिफ्टर साईखोम मीराबाई चानू


इम्फाळची ही मीराबाई. लहानपणी डोक्यावर मोळी अशी सहज वाहून न्यायची, जी तिच्या भावाला हलवणं मुश्कील व्हायचं. तिथून या मुलीचा वेटलिफ्टिंगचा प्रवास सुरूझाला. आणि जागतिक दावेदारी सांगत ती म्हणता म्हणता चॅम्पिअन बनली. 2014 पासून सुवर्णपदकं जिंकत मीराबाईनं वेटलिफ्टिंगमध्ये आपलं मानाचं स्थान निर्माण केलं आहे.
2018 साली देशातला क्रीडा क्षेत्रतला सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार भारत सरकारने तिला प्रदान केला. 
आणि आता ती ऑलिम्पिक पदकावर दावेदारी सांगायला सज्ज झाली होती. ती म्हणतेच ना, ‘सोच लिया था अब की बार, बस. वो ही ड्रिम है!’
मात्र त्या स्वपAाला वर्षभर टाळं लागलं; पण मीराबाईची दुनिया?
त्या दुनियेत काहीही बदललं नाही..

मीराबाई सांगते.
मै घर नहीं गया, नहीं गया इम्फाळ. पटियाला में कॅम्पमेंही हूं!
ऑलिम्पिकच्या आधी मी खरं तर एशियन चॅम्पिअनशिपची तयारी करत होते. एकदम फोकस्ड, की बेस्ट परफॉर्मन्स करायचा. की आहेच ऑलिम्पिक.
नहीं हुआ, बुरा तो फील होता ही है!
पण मग काय उदास बसायचं का? जरा वेळ लागला समजायला की आता काय करायचं? समोर काही टार्गेटही नाही. मी जरा ब्लॅँकही झाले.
एकाच खोलीत किती काळ बसणार?
मग मात्र आम्ही पुन्हा तयारी लागलो. वेट ट्रेनिंग तर होतंच; पण फिटनेस ट्रेनिंगवर भर दिला. टेक्निकल ट्रेनिंगही सुरूच ठेवलं. कोच विजय शर्मा ट्रेनिंग करवत आहेत.
आता मी स्वत:लाच सांगतेय की, आता आपल्याकडे वेळ आहे. अजून ट्रेनिंग करू, अजून मेहनत करू. बहौत टाइम है, बहौत मेहनत भी करेंगे.
आराम केला लॉकडाऊनमध्ये थोडा, मात्र स्वत:ला फिट, फाइन, फोकस्ड ठेवणं. हेच आता महत्त्वाचं आहे.
मुश्किलें तो आती ही है. आएगी. पिछे थोडी ना हटेंगे !

तिरंदाज प्रवीण जाधव


सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सरडे हे प्रवीण जाधवचं गाव. अतिशय कष्ट करत त्यानं स्वत:ला ऑलिम्पिक पात्र बनवलं.
नेदरलँडमध्ये पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरु ष तिरंदाजी संघाने सांघिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली. 
तरुणदीप राय, अतानू दास या मातब्बर खेळाडूंसोबत प्रवीण जाधवनेही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिद्ध केलं.
आणि आता त्याला ऑलिम्पिकचे वेध लागलेले आहेत.

प्रवीण सांगतो.
‘कोरोना भारतात दाखल झाला तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली. पण सरावात खंड पडू दिला नाही.
लॉकडाऊन झाला, आता ऑलिम्पिकही पुढे गेलं.
मात्र मी ठरवलं, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या आहे तशा स्वीकारणं भाग आहे.
गेलं वर्षभर मी कुटुंबापासून लांब राहिलो. मला फक्त ऑलिम्पिक दिसत होतं. आमच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणा:या मुग्धा मॅडम यांनीही आम्हाला बरंच प्रोत्साहित केलं.
मनावरील मरगळ झटकली. हे आयुष्य आहे आणि ते असंच अनपेक्षितपणो कलाटणी मारू शकतं याची तयारी आपण ठेवायलाच पाहिजे.’
पुणो येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट, खराडी येथे प्रवीण सराव करतोय. पहाटे चारला त्याचा दिवस सुरू होतो. खेळ, योगा झाल्यानंतर सकाळी 9 ते 12 किंवा संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत सराव करतो.
आहे ती परिस्थिती स्वीकारून लढायचं एवढंच हातात आहे, असं प्रवीण म्हणतो.

शूटर तेजस्विनी सावंत

कोल्हापूरची तेजस्विनी सावंत. लॉकडाऊनमुळे ती कोल्हापुरातील
राजेंद्रनगर येथील घरीच सराव करत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या
शूटिंग रेंजवर सराव करता येणं शक्य नाही. पण तरी ऑलिम्पिक टार्गेट मात्र तिच्या डोळ्यासमोर कायम आहे.
गेल्या वीस वर्षात तिने आशियाई, विश्वचषक, राष्ट्रकुल अशा एक ना अनेक
स्पर्धामध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला आहे. 

तेजस्विनी सांगते.
खरं तर 26 ते 29 जुलैदरम्यान माङो स्पर्धेचे वेळापत्नक होते. त्यात कदाचित मी पदकालाही गवसणी घातली असती. आज होणारी स्पर्धा
पुढील वर्षी होईल. त्यामुळे मी याचे दु:ख करत बसत नाही.
मात्र या परिस्थितीत मला पुणो किंवा दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय
दर्जाच्या शूटिंग रेंजवर सराव करायला मिळत नाही याचं दु:ख आहे. अर्थात ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं माझं अंतिम ध्येय
असलं तरी नेमबाजी माझी पॅशन आहे. मी नशीबवान आहे कारण खेळ आवडतो म्हणून खेळते व नोकरीही मला या खेळावरच मिळाली आहे. माङो पहिले गुरु जयसिंग कुसाळे व प्रशिक्षक कोहली गांगुली यांची शिकवण सोबत आहेच. सध्या मी सकाळी साडेपाच वाजता उठते. त्यानंतर एक तासभर योगसन, ध्यानधारणा आणि त्यानंतर नेमबाजीला लागणारे शारीरिक व्यायाम करते. 
प्रशिक्षकाबरोबर काही मिनिटे चर्चा करते. त्यानंतर दहा मीटर घरातील
रेंजवर रायफल 5क् मीटर थ्री पोङिाशनचाही कॅप नावाचे नेमबाजीचे अॅप रायफलला लावून सराव करते. सायंकाळी फिजिओथेरपिस्ट ऑनलाइन
मार्गदर्शन करून व्यायाम घेतात. त्यामुळे दिवसभरात किमान पाच तास याही
परिस्थितीत नेमबाजीचा सराव सुरू आहे.

शूटर राही सरनोबत 


कोल्हापूरची राही. आजवर तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या. 25 मीटर पिस्टोल प्रकारात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू.
तेव्हापासून येत्या ऑलिम्पिकर्पयत तिने आपली घोडदौड सुरूठेवली आहे.

राही सांगते.
सरावातील सातत्य मी सोडलेले नाही. मी कोल्हापुरातील संभाजीनगर येथील विभागीय क्र ीडा संकुलात लॉकडाऊनच्या काळातही शूटिंग रेंजवर सराव करत आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जरी चार चार वर्षाच्या अंतराने असल्या तरी त्यासाठीचे नियोजन अगोदरपासूनच करावे लागते. 2क्17 सालापासून मी 2020 च्या स्पर्धेसाठी तयारी करत आहे. त्यामध्ये स्पर्धेसाठीची रेखीव आखणी
स्पर्धदरम्यान कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व काय टाळले पाहिजे.
सरावात सातत्य ठेवले पाहिजे. आहारावर नियंत्नण, व्यायाम, ध्यानधारणा, प्रशिक्षकांशी चर्चा हे सारं सुरूच आहे.
माङया हाताला अंतर्गत इजा आहे. त्याकरता बर्फाचा शेक घेते. दिवसभरात दोन प्रहारात यापूर्वी सराव करत होते. आता मात्न, सकाळी चार ते पाच तास सराव करते. माङया नेमबाजीच्या कारकिर्दीत सलगपणो माझी तिस:या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अगदी समजा स्पर्धाच रद्द झाली तर मी 2024ची तयारी आताच सुरू केली आहे. याकाळात मला वाचनाचा मोठा आधार आहे. गेल्या चार महिन्यात मी अनेक कथा, कादंब:या वाचल्या. त्यात मला सेपीयन्स ही कादंबरी आवडली. 

अॅथलिट अविनाश  साबळे


बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा अविनाश.
मजुरी करून शिक्षण पूर्ण करत हा लाल मातीतला खेळाडू फौजी होतो. 
एक दोन नव्हे तर तब्बल चार वेळा स्वत:चं रेकॉर्ड त्यानं तोडलं.
2019 साली दोहा येथे पुन्हा एकदा आशियाई स्पर्धा झाली. त्यानं सिल्व्हर मेडल पटकावलं. एवढा संघर्ष केल्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये त्याची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली.

अविनाश सांगतो.

मी सैन्यात भरती झालो. सुरुवातीपासूनच मला इंडियन आर्मीने सहकार्य केले आहे. आर्मी हे नाव ऐकलं की ऊर भरून येतो.
त्यामुळे लढायचं हेच मी शिकलो आहे. सध्या मी जम्मू-काश्मीरमध्ये पोस्टिंगवर आहे. कर्तव्याबरोबरच खेळाचे धडेही गिरवतो आहे.
त्यांचा आधार आणि आशीर्वाद आहेच सोबत.
मुळात मी खूप बिकट परिस्थितीतून इथवर आलो, त्यामुळे जिद्द, चिकाटी आणि मेहनत करत राहायचं हेच मला माहिती आहे.
ऑलिम्पिकसाठीचा माझा सराव सध्या खूप छान सुरू आहे. आता केवळ स्पर्धेत धावण्याची वेळ कधी येते याची मी वाट पाहतोय..

Web Title: meet Indian olympic qualified players, keeping patience with passion in corona virus lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.