अमेरिकेन रिऍलिटी शोमध्ये जगाला वेड लावणारे कोण हे सुमंथ-सोनाली? आला कुठून त्यांचा बॅड सालसा? 

By meghana.dhoke | Published: June 4, 2020 07:22 PM2020-06-04T19:22:49+5:302020-06-04T19:32:26+5:30

सोनाली मुजुमदार आणि सुमंथ मारुजो. अमेरिकाज गॉट टॅलण्टच्या ऑडिशनची व्हिडीओ क्लिप रिलीज झाली आणि त्यांच्या ‘बॅड सालसा’नं जगभरातले लोक दिवाने झाले. शोधू लागले की ही मुलं कोण? कुठली? हे असे बेफाम वेगवान नृत्य शिकली कुठून? नेमकी आहे काय त्यांची गोष्ट? - ही त्यांची गोष्ट तर आहेच; पण फक्त त्या दोघांची नाही. ही गोष्ट तिघांची आहे. आणि यात एक न दिसणारा चेहरा आहे - त्याचं नाव, बिवाश चौधरी.

Bad Salsa: The Story of Sumanth, Sonali and Bivash choudhari | अमेरिकेन रिऍलिटी शोमध्ये जगाला वेड लावणारे कोण हे सुमंथ-सोनाली? आला कुठून त्यांचा बॅड सालसा? 

अमेरिकेन रिऍलिटी शोमध्ये जगाला वेड लावणारे कोण हे सुमंथ-सोनाली? आला कुठून त्यांचा बॅड सालसा? 

Next
ठळक मुद्देवो करना है, जो कोई नहीं करेगा.!

- मेघना ढोके

फटा पोस्टर निकला हिरो. त्या दोघांची गोष्टही तशीच आहे. त्यांचा ‘धटिंग’ डान्स तुम्ही एव्हानाही पाहिलाही असेल. साऱ्या  जगानं पाहिली ती क्लिप.
लोक अवाक् झाले. शोधू लागले की आली कुठून ही जोडी?
सोनाली मुजुमदार आणि सुमंथ मारुजो. भारतीय डान्स रिऍलिटी  शो ज्यांनी पाहिलेत, त्यांना ही नावं नवीन नाहीत. गेल्या पाच वर्षात अनेकदा टीव्हीवर ही जोडी झळकली आणि त्यांनी वेड लावलं लोकांना.
सोनालीचं वय होतं पाच वर्षे, सुमंथ 10-11 वर्षाचा तेव्हापासून त्यांनी रिऍलिटी  शोंच्या जगावर राज्य केलं आहे. पण आता मात्र अमेरिकाज गॉट टॅलण्टच्या ऑडिशनची व्हिडीओ क्लिप रिलीज झाली आणि त्यांच्या ‘बॅड सालसा’नं जगभरातले लोक दिवाने झाले.
शोधू लागले की ही मुलं कोण? कुठली? हे असे बेफाम वेगवान नृत्य शिकली कुठून?
नेमकी आहे काय त्यांची गोष्ट?
- ही त्यांची गोष्ट तर आहेच; पण फक्त त्यांची नाही. त्या दोघांची नाही.


ही गोष्ट तिघांची आहे. आणि सुमंथ-सोनालीसह यात एक न दिसणारा चेहरा आहे- त्याचं नाव, बिवाश चौधरी. (नावाचा उच्चर बिभाष).
सुमंथ आणि सोनाली ज्यांच्याकडे नृत्य शिकतात तो हा बिभाष. वय वर्षे 38 वर्षे. इतकी वर्षे तो कोलाकात्यात गुरुकुलप्रमाणो संस्था चालवत होता आता बिभाषने मुंबईत अर्थात पालघरला आपला मुक्काम हलवला आहे आणि आता पालघरमधूनच संस्थेचं काम आणि नृत्यप्रशिक्षण चालतं.
बॅड सालसा असा उल्लेख सुमंथ-सोनाली करतात, त्यातला बॅड म्हणजेच बिभाष अकॅडमी ऑफ डान्स. - अर्थात बॅड. सुमंथ-सोनालीची गोष्ट सांगण्यापूर्वी या बॅडची अर्थात बिभाषच्या अकॅडमीची आणि बिभाषची गोष्ट सांगावी लागेल.
बिभाषला फोन केला तर तो पालघरलाच होता. अर्थात खूश होताच की त्याच्या शिष्यांनी अमेरिकेत जाऊन ऑडिशनच अशी गाजवली की पुढे शो सुरूहोईल तेव्हा ते जगभर कहर करतील याची त्याला खात्रीच आहे.
सुमंथ-सोनालीने दणक्यात परफॉर्म केलं याचं मात्र त्याच्या बोलण्यात काही विशेष कौतुकसुरुवातीला जाणवत नाही. 
तो सहज म्हणतो, ‘इतना तो करनाही था ना, ये इतना फास्ट तो करही लेना चाहिए. सरप्राइज तो चाहिएही ना परफॉर्मन्समें, वो ये लोग. अच्छा किया वैसे.!’
क्षणभर वाटतंही की, जग वेडं झालं त्या पोरांमागे आणि त्यांचा गुरु मात्र म्हणतो की, इतना तो करनाही था. हे काय आहे?
मात्र त्याच्याशी गप्पा मारताना कळतं की, लहान सहान यशावर समाधान मानलं असतं तर इथवर ही मुलं, बिभाषच्या भाषेत- मेरे बच्चे- पोहचलेच नसते. म्हणून म्हटलं सुमंथ आणि सोनालीच्या स्टोरीपूर्वी बिभाषची गोष्ट येते, नृत्यासाठीच्या दिवानगीची आणि जीव गेला तरी बेहत्तर; पण बेभान नाचण्याची.
बिभाषशी यासंदर्भात फोनवर भरपूर गप्पा झाल्या, तो आपल्या मुलांविषयीच बोलतो, स्वत:विषयी कमीच. थोडक्यात सांगतो त्याची कहाणी.
पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात एक गाव आहे बागनान. तिथं बिभाषचे मामा राहात असत. वडील कोलकात्यात होते. मात्र त्यांची तब्येत बिघडली, काम होईना म्हणून मग सगळे बागनानला राहायला गेले. कोलकात्यापासूनही हे गाव तास-दीड तासाच्या अंतरावर. बिभाष शाळेत जात होता, टीव्हीवर नाच पाहून पाहून नाच करायचा. पण त्याहून जास्त काही त्याच्या अवतीभोवती नव्हतंच. तो बारावीत होता, तेव्हाच वडील वारले.
त्यानंतर हा काही काळ हावडा आणि मग कोलकातात राहिला. ओळखीपाळखी शोधून सिनेमच्या डान्स क्रूर्पयत पोहोचला. तिथं डान्स करायचा. 2क्क्6च्या आसपासची ही गोष्ट. मग त्याच दरम्यान त्यानं बंगाली टीव्हीच्या रिअॅलिटी शोसाठी मिळेल ते काम केलं. त्यानंतर त्याला इ-टीव्ही बंगालीचा एक रिअॅलिटी शो मिळाला. छोटंसंच काम होतं. पण गाडं पुढं सरकलं. त्यानंतर त्याला ‘डान्स बंगाल डान्स’ हा शो मिळाला. तो मात्र त्यानं गाजवला. जिंकला.
- आणि आयुष्य झपकन पुढे सरकलं.
बिभाष सांगतो, ‘मी डान्स कुठंच शिकलो नाही, पाहून पाहून शिकलो टीव्हीवर. मात्र त्याच काळात एक मोठी गोष्ट झाली. इंटरनेट आलं. मग माङया लक्षात आलं की, आता कुणाला मला डान्स शिकवं, असं म्हणायची गरजच उरलेली नाही. जगभरातली नृत्यं इथं पाहता येतात, शिकता येतात. नृत्य म्हणजे तरी काय असतं, एक प्रेङोण्टेशन, एक गोष्ट मांडायची असं मी समजून चाललो. पाहून पाहून शिकलो. आणि मग मला कळलं की, रिअॅलिटी शोमध्ये जिंकायचं तर काय लागतं. काय प्रकारचं सादरीकरण लागतं. आणि तिथून मी सुटलो, तेव्हाच ठरवलं, वो करना है, जो कोई नहीं करेगा.! तिथूनच मग सालसा, कंटेम्पररी, हिपहॉप, अॅक्रोबिट्स यासा:यातून आमचा फॉर्म उभा राहिला, मी त्याला नाव दिलं- बॅड. बिभाष डान्स अकॅडमी. बॅड सालसा, बॅड कंटेम्पररी. सबकुछ बॅड!’
पण मग अकॅडमी सुरूकरावी असं का वाटलं, असं विचारलं तर बिभाष सांगतो, ‘मैने बहोत ठोकरे खाई. बहोत. वो स्ट्रगल जो किया वो किया, त्याकाळात माङया लक्षात आलं होतं की, आपल्याकडे फक्त टॅलण्ट असून चालत नाही तर त्याला कुणीतरी हात द्यायला पाहिजे. कुणीतरी ते वेळीच ओळखून त्यावर अधिक काम करायला पाहिजे, म्हणायला पाहिजे, मी आहे, जमेल तुला ! टॅलण्ट ढुंढना, टॅलण्ट दिखना ये भी एक टॅलण्ट है ! मी जरा बरे दिवस आल्यावर ठरवलं की, आपण गुणी मुलांना मदत करू, शिकवू, त्यांची वाट सोपी करता आली तर करू.!’
आणि म्हणून त्यानं कोलकात्यात ही डान्स अकॅडमी सुरूकेली. त्यातून मुलं यायला लागली. काहींची परिस्थिती होती. काहींची नव्हती. कुणाला फी देता येणं, कोलकात्यात राहणंही शक्य नव्हतं. कोरिओग्राफर म्हणून आपली मुलं विविध डान्स शोमध्ये झळकत राहणं, हे बिभाषसाठीपण गरजेचं होतं. त्यानंच मग मुलं शोधायला सुरुवात केली आणि त्यातून सापडले सुमंथ आणि सोनाली..
अनेक रिअॅलिटी शो गाजवत, जिंकत, काही लाखांची पारितोषिकं जिंकत आता ते थेट अमेरिकाज गॉट टॅलण्टर्पयत पोहोचले आहेत.
त्यांचा बॅड सालसा. त्यातला वेग पाहून लोक चकीत झालेत..

सुमंथ आणि सोनाली
 ‘अमेरिकाज गॉट टॅलण्ट’ची ऑडिशनची गाजवणाऱ्या  या दोघांच्या आयुष्यात आहेत फक्त तीन गोष्टी :
 डिसिप्लीन, डेडीकेशन आणि डिटरमिनेशन.

बिभाष सांगतो, 2011 साली सोनाली  आली. 5 वर्षाची होती. अत्यंत उत्तम डान्सर, तिचे वडील तिला घेऊन आले होते. पण दिवसाला 70-80 रुपये कमाई करून घर चालवणारा तो माणूस. त्याला काय सांगणार फी द्या. तेव्हा अकॅडमी गुरुकुल पद्धतीने नुकतीच सुरूकेली होती. तिथंच मग सोनालीच्या राहायची खायची व्यवस्था केली. आठ तास डान्स, बाकी अभ्यास नंतर. फोन नाही. बाकी काही नाही ही शिस्त तेव्हापासूनची.
पश्चिम बंगालच्या बागदा गावची ही मुलगी. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतेय. ती अकॅडमीत आली तेव्हा तिला सालसा नावाचा शब्दही माहिती नव्हता. काहीतरी खायचा पदार्थ असावा असं त्या छोटुल्या मुलीला माहिती होतं. तिथून तिनं पहिली भरारी घेतली ती दोनच वर्षात ‘इंडिया गॉट टॅलण्ट’ हा शो ती सुमंथ बरोबर जिंकली. त्यानंतर ‘झलक दिखला जा’मध्येही दुस:या स्थानार्पयत ते दोघे पोहोचले. रिअॅलिटी शो नावाची गोष्ट त्यांना आता कळायला लागली होती.
तेच सुमंथचंही.
हा मुलगा ओरिसातला. भुवनेश्वरचा. त्यानं टीव्हीवर बॅड सालसाचे डान्सर रिअॅलिटी शोमध्ये नाचताना पाहिले होते. तो वडिलांच्या मागे लागला, मला या अकॅडमीत शिकायचं. त्यांनी त्याचं नाव घातलं. दर आठवडय़ाला भुवनेश्वर ते कोलकाता असा प्रवास करून यायचा. नंतर तोही अकॅडमीतच राहायला आला.
एकेक करत ही मुलं रिअॅलिटी शो जिंकत राहिली. आधी भारतात, मग ब्रिटनमध्ये आणि आता अमेरिकेत ते रिअॅलिटी शो गाजवत आहेत.
आज सोनाली आहे 15 वर्षाची आहे आणि सुमंथ आहे 21 वर्षाचा.
त्यांचे गुरु बिभाष सर सांगतात, ‘भारतीय टीव्हीवरचे बहुतेक सगळे शो या मुलांनी जिंकले आहेत. प्राइस मनी घरी नेलाय. मात्र याकाळात एक गोष्ट सोडायची नाही ही आमची शिस्त आहे. मेहनती तर ही मुलं आहेतच. मेहनतीला पर्याय नाही. मात्र यशस्वी व्हायचं तर तीन डी लागतातच, डिसिप्लीन, डेडीकेशन आणि डिटरमिनेशन. त्याला पर्याय नाही. आजही त्यांना फोन वापरण्याची परवानगी नाही. डान्सपेक्षा मोठं काही नाही. त्यांचा फोकस हलेल, चित्त भिरभिरेल असं काहीही केलेलं चालणार नाही. आठ तास रोजचं डान्स शेडय़ूल. मग इंटरनेट पाहून ते त्यांचा त्यांचा रिसर्च करतात, आपण जो फॉर्म करतोय, त्यात काय लागेल हे स्वत: शोधतात. आणि मग शाळा-कॉलेजचा अभ्यास. सुमंथ फस्ट इयरला, सोनालीने दहावीची परीक्षा दिली आहे.!’
हे असं रुटीन या मुलांचं वर्षानुवर्षे चाललं आहे.

पैसे के लिए  कौन करता है रिऍलिटी  शो?
बिभाष म्हणतो, रिऍलिटी  शोचा एक पॅटर्न असतो. सादरीकरण असतं. मात्र प्रत्येकवेळी असं डोक्यात असतं की, मै ऐसा कुछ करुं की बस दुनिया देखती रह जाए. एैसी चीज बनाऊं, की दुनिया पुछे की ये कैसे किया? दुनिया बहोत देखी है, त्यामुळे चांगलं काम हेच लक्ष्य आहे, तेच मी माझ्या  मुलांनाही सांगतो. भविष्यात मला स्वत:ला डिरेक्टर व्हायचं आहे. तेही स्वपA आहेच. त्यासाठी मी अजून शिकतोय. आता आजवर 30 देशांत आम्ही शो केले आहेत. प्रत्येकवेळी काहीतरी नवं शोधणं, जुनं बदलणं, इंटरनेटवर पाहून, त्यात बदल करणं हे सारं आम्ही करत राहतो. पुन्हा पुन्हा स्वत:ला हेच सांगतो, वो कर जो वल्र्ड में कोई नहीं करेगा.!’
- तेच केल्यानं बहुदा अमेरिकाज गॉट टॅलण्टच्या स्टेजवरही लोक चकीत झाले त्यांचा डान्स पाहून.
आता पालघरमध्ये बिभाष अकॅडमी चालवतो आहे. सांगतो आता शोधतोय की, आसपासच्या आदिवासी मुलांत आहे का असा कुणी ‘बिभाष’ ज्याच्यात टॅलण्ट आहे आणि त्याला मदत हवी आहे ! मात्र मदतीसह त्यालाही हेच सांगणार की, वो कर जो वर्ल्ड  में कोई नहीं कर सकता..

(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: Bad Salsa: The Story of Sumanth, Sonali and Bivash choudhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.