coronavirus : ते बेल्जिअन डॉक्टर म्हणतात, वाटलं होतं की मरणार मी!

By meghana.dhoke | Published: April 21, 2020 04:05 PM2020-04-21T16:05:47+5:302020-04-21T16:07:00+5:30

उपचार करता करता स्वत: कोरोनबाधित डॉक्टरची साडेतीन आठवडय़ांची झूंज

coronavirus : belgium-doctor says i-thought-i-would-never-wake-up- | coronavirus : ते बेल्जिअन डॉक्टर म्हणतात, वाटलं होतं की मरणार मी!

coronavirus : ते बेल्जिअन डॉक्टर म्हणतात, वाटलं होतं की मरणार मी!

Next
ठळक मुद्देबेल्जिअममध्ये तर कोरोनाने मरणाचा चक्रव्युह आखलाय

जगण्याचे आनंद छोटे असतात आणि तेच महत्वाचे आणि अस्सल असतात हे माणसाला जाणवायला लागलं तो हा काळ.
 डॉक्टरची ही गोष्ट. ब्रसेल्स शहरातली. डॉ. अॅण्टोनी ससेन,  वय वर्षे 58. मुत्रविकारतज्ज्ञ. आजवर अनेक रुग्ण पाहिले. मरण काही पाहिलं नव्हतं असं नाही, मात्र बेल्जिअममध्ये कोरोनानं उडवलेला हाहाकार सगळ्यानांच विषण्ण करुन टाकणारा आहे.
त्याला हे डॉक्टरही अपवाद नाही. ते आणि त्यांचे सहकारी श्वसनविकार, त्यातून मुत्रशयाचे होणारे विकार यासाठीचे उपचार करत होतेच.
मात्र त्याचकाळात त्यांना कोरोनानं गाठलं.
लागण झाली. आणि तब्येत इतकी खालावली की ते साडेतीन आठवडे कोमात गेले. सगळं संपल्यातच जमा होतं.
पण कोरोनाशी ही लढाई ते जिंकले आणि कालच त्यांना अतीदक्षता कक्षातून बाहेर आणण्यात आलं.
त्यानंतर डेल्टा कायरॅक हॉस्पिटल जिथं ते काम करतात, तिथूनच त्यांनी परिजनांसह सर्वांशीच व्हिडीओ संवाद साधला.
ते सांगतात, ‘ मलाही एका क्षणी वाटलं होतं की, संपलं, आता आपण मरणार! आता या काळझोपेतून आपण कधीही उठणार नाही! मात्र एकीकडे असं वाटणं दुसरीकडे मी मनात स्वत:ला सांगत होतो की, उठ, जागा हो, तूला जगायचं आहे. कामं आहेत, तू असा झोपून कसं चालेल.’
ही जगण्यामरण्याची झुंज अंतिमत: ते जिंकले आणि उठून बसले.
तो उठून बसण्याचा, पहिल्यांदा डोळे उघडण्याचा अनुभव ते सांगतात, ‘ आजवर आयुष्यात मला कधीही इतका आनंद झाला नव्हता, मी डोळे उघडले तर समोर माङो सहकारी डॉक्टर उभे होते. त्यांचे हसरे चेहरा पाहिले, शब्दात नाही सांगता येणार काय वाटलं. विलक्षण होतं ते! मी जगलो, जागा झालो ते कसं असा विचार केला तर वाटतं एकीकडे मरण उभं होतं. माङो वडील चार वर्षापूर्वी गेले, ते मला दिसले, मी त्यांच्याशी बोलत होतो. दुसरीकडे मला वाटत होतं की, हा आपला रस्ता नाही. आपल्याला जगायचं आहे.’
जगण्यामरण्याची सीमा ओलांडून ते आले आणि ते सा:या जगाला एकच गोष्ट सांगतात, ‘ आता एकच इच्छा आहे, एकदा माङया कुटुंबाला कडकडून मीठी मारायची आहे. मला लागण झाली तसं मी त्यांना फक्त लांबून पाहतो आहे. आता बरा झालो की मी त्यांना मीठी मारणार आहे.’
ैआपली माणसं, ती सोबत असणं, त्यांचा स्पर्श, त्यांना मिठी मारुन सांगणं की मी आहे, तुम्ही आहात माङयासाठी हे सारं किती मोलाचं असतं, पण एरव्ही त्याची किंमत नसते. ती मरणाच्या दारात या डॉक्टरांनाच नाही आता सगळ्यांना कळते आहे.
बेल्जिअममध्ये तर कोरोनाने मरणाचा चक्रव्युह आखलाय, 38,496 जणांना बाधा झाली तर 5,638 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
जगण्याची लढाई अखंड चालू आहे. 
 

Web Title: coronavirus : belgium-doctor says i-thought-i-would-never-wake-up-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.