आम्ही सारे पँथरवाले... आमचा सरदार राजा ढाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:47 PM2019-07-17T18:47:49+5:302019-07-17T18:49:22+5:30

भडकलगेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भावपूर्ण श्रद्धांजली 

We are all panthers ... our King Raja Dhale ... | आम्ही सारे पँथरवाले... आमचा सरदार राजा ढाले...

आम्ही सारे पँथरवाले... आमचा सरदार राजा ढाले...

googlenewsNext

औरंगाबाद

‘आम्ही सारे पँथरवाले, आमचा सरदार राजा ढाले,
ब ब बदला घेण्या रणी, उठलो चवताळुनी,
काळाची ही गरज होती, पँथरची ही जाग,
उरी पेटली दलितांच्या बदल्याची आग’ 

 

या माजलगावचे शाहीर आत्माराम साळवे यांच्या पोवाड्याची आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकलगेटवरील पुतळ्याजवळ दिवंगत राजा ढाले यांना श्रद्धांजली अर्पण करताना आठवण केली. 

राजा ढाले यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच औरंगाबादमधील त्यांचे चाहते, समकालीन कार्यकर्ते व नेते अस्वस्थ बनले. राजाभाऊंचे तत्कालीन कार्यकर्ते रतनकुमार पंडागळे व सहकाऱ्यांनी तात्काळ भडकलगेटवर शोकसभा आयोजित केली. राजा ढाले यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा खंदारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर माधवराव घोरपडे, साथी सुभाष लोमटे, माजी नगरसेवक के.व्ही. मोरे, गौतम लांडगे, गौतम खरात, माणिक साळवे, बाबूराव नरवडे आदींची भाषणे झाली. यावेळी मिलिंद दाभाडे, अनिल भिंगारे, शांतीलाल दाभाडे, राधाकृष्ण पंडित, सतीश शिंदे, मोतीलाल प्रधान, भगवान भुईगळ, कमलेश चांदणे आदींची उपस्थिती होती. अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. 

रतनकुमार पंडागळे म्हणाले, राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. ते जेव्हा जेव्हा औरंगाबादला येत, तेव्हा तेव्हा मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर असायचो. दलित पँथर, मागोवा व युक्रांद या संघटनांमध्ये त्या काळी एक समन्वय असायचा. प्रस्थापित राजकारणाला विरोध हा समान धागा होता. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ या जोडगोळीने त्यावेळी पँथरच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची मोठी लढाई सुरू केली होती. संविधानावर घाला घालण्यास टपलेल्या मंडळींचा विरोध करण्यास आज राजा ढाले यांचे नेतृत्व हवे असतानाच ते आपल्यातून गेले. त्यामुळे एक पोकळी निर्माण झाली, असे साथी सुभाष लोमटे यांनी नमूद केले. माधवराव घोरपडे म्हणाले, राजा ढाले यांनी आम्हाला अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवलं. ते औरंगाबादला आले की, अनेकदा आमच्या उस्मानपुरा येथील निवासस्थानी यायचे. बैठका व्हायच्या. त्यांची आठवण नेहमीच येत राहील.
 

Web Title: We are all panthers ... our King Raja Dhale ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.