Video : न्यायालयाच्या आवारात उभ्या कारवर झाड कोसळले, सुदैवाने कारमधील चारही वकील बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 05:54 PM2021-10-06T17:54:55+5:302021-10-06T17:57:52+5:30

Rainfall in Aurangabad : दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अचानक ढग दाटून येत अंधार झाला

Video: A tree fell on a car parked in the court premises at Aurangabad Session Court, fortunately all four lawyers in the car safe | Video : न्यायालयाच्या आवारात उभ्या कारवर झाड कोसळले, सुदैवाने कारमधील चारही वकील बचावले

Video : न्यायालयाच्या आवारात उभ्या कारवर झाड कोसळले, सुदैवाने कारमधील चारही वकील बचावले

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात दुपारी ३ वाजता अचानक वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला ( Rainfall in Aurangabad ) सुरुवात झाली. यावेळी सेशन कोर्टात उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळले. सुदैवाने कारमधील चारही वकील थोडक्यात बचावले आहेत. (  A tree fell on a car parked in the Aurangabad Session Court premises, four lawyers  safe) 

शहराला पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपले आहे. दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अचानक ढग दाटून येत अंधार झाला . यानंतर वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटासह तब्बल एक तास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारतीमागे ॲड. विनायक उपाध्ये, ॲड. विनोद मुंदडा, ॲड. सुधीर कुलकर्णी आणि ॲड. कल्पना राठोड हे एका कारमध्ये ( एम एच २० डी जे ५९०३ ) होते. ॲड. विनायक उपाध्ये कार मागे घेत असताना अचानक कारवर समोरच्या बाजूने एक झाड कोसळले. कोर्टातील जमादार धीरज काबलीये आणि इतर लोकांनी लागलीच कारमधील चारही वकिलांना बाहेर काढले. चारही वकील सुखरूप आहेत. झाड कोसळ्याने तीन कारचे आणि काही दुचाकींचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. 

Web Title: Video: A tree fell on a car parked in the court premises at Aurangabad Session Court, fortunately all four lawyers in the car safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.