शेतकऱ्यांकडून ४ हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:33 IST2020-02-01T13:20:23+5:302020-02-01T13:33:18+5:30

ग्रामसभेचा ठराव घेण्यासाठी मागितली लाच

Rural Development Officer in the net of ACB taking bribe of Rs. | शेतकऱ्यांकडून ४ हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

शेतकऱ्यांकडून ४ हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद/पिशोर : कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुधाकर नारायणराव घुले यांना शेतकऱ्यांकडून चार हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. औरंगाबाद लाचलूचपत विभागाने शनिवारी सकाळी ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड व विहीर खोदकाम करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव देण्यासाठी प्रत्येकी हजार प्रमाणे चार जणांकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार शेतकऱ्यांनी घुले यांच्या विरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून लाचलूचपतच्या पथकाने औरंगाबाद येथील टीव्ही सेंटर परिसरात शनिवारी सकाळी सापळा लावला. यावेळी शेतकऱ्यांकडून चार हजार रुपये स्विकारतांना घुले यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया,  अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार , पोलीस उप अधीक्षक मारुती पंडित यांच्या मागर्दर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पो.ना . विजय बाम्हंदे.पो. ना. सुनील पाटील , पो शि. विलास चव्हाण, केदार कंदे, कपिल गाढेकर, चालक चांगदेव बागुल या पथकाने केली.

Web Title: Rural Development Officer in the net of ACB taking bribe of Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.