Rickshaw driver commits indecent behavior with the female passenger | महिला प्रवाशासोबत अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकास बदडले
महिला प्रवाशासोबत अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकास बदडले

ठळक मुद्देरात्रपाळीचे रिक्षाचालक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

औरंगाबाद : लोटाकारंजा येथे जाण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री रेल्वेस्टेशन येथे दोन मुलीसह रिक्षात बसलेल्या महिलेसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकास नागरिकांनी बेदम चोप देऊन वेदांतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याविषयी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली.

शेख असिफ शेख चाँद (२२, रा. नारेगाव) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार ३५ वर्षीय महिला नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी आंध्र प्रदेशमध्ये गेली होती. बुधवारी रात्री देवगिरी एक्स्प्रेसने ते सर्व परतले. रेल्वेस्टेशन येथून लोटाकारंजाला जाण्यास तक्रारदार, त्यांच्या दोन मुली एका रिक्षात बसल्या. तर त्यांचे नातेवाईक दुसऱ्या रिक्षातून निघाले. स्टेशन बाहेर काही अंतरावर गेल्यानंतर चालकाने रिक्षा थांबविली आणि सामान सुस्थितीत आहे अथवा नाही, हे पाहतो असे म्हणून त्याने महिलेसोबत अश्लील वर्तन केले. यामुळे महिला घाबरली. मात्र सोबत लहान मुली असल्याने त्यांनी  लगेच जाब विचारला नाही.

पुढे काही अंतरावर गेल्यानंतर त्याने पुन्हा रिक्षा थांबवून तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीडितेने पतीला फोन केला. यानंतर आरोपीने वेगात लोटाकारंजा गाठून त्यांना सोडून   पसार झाला.महिलेने पतीस हा प्रकार सांगितला. रिक्षा क्रमांक त्यांना माहिती असल्याने त्यांनी लगेच रेल्वेस्टेशन गाठले आणि रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि त्यास चांगलाच चोप दिला. 

रात्रपाळीचे रिक्षाचालक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
रात्रपाळीत प्रवासी वाहतूक करणारे ७० टक्के रिक्षाचालक नशेत धुंद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्याकडे वाहन  परवानाही नसतो. या रिक्षाचालकांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने रिक्षाचालकांकडून महिलेसोबत घाणेरडे वर्तन होण्याच्या घटना वाढत आहेत. शिवाय रिक्षाचालकांकडून सामान्य प्रवाशांची लूट, खुनासारख्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Rickshaw driver commits indecent behavior with the female passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.