अल्पवयीन बालकाने पित्याची हत्या करून मृतदेह घरात पुरला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 05:38 PM2020-02-29T17:38:15+5:302020-02-29T17:38:21+5:30

अल्पवयीन मुलाने जन्मदात्या पित्याचा खुन करून त्याचे प्रेत घरात पुरून ठेवल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

A minor boy killed his father and buried his body in the house | अल्पवयीन बालकाने पित्याची हत्या करून मृतदेह घरात पुरला

अल्पवयीन बालकाने पित्याची हत्या करून मृतदेह घरात पुरला

googlenewsNext

कन्नड - अल्पवयीन मुलाने जन्मदात्या पित्याचा खुन करून त्याचे प्रेत घरात पुरून ठेवल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील जामडी घाट येथील नामदेव पोमा चव्हाण ( ४७ ) हे दोन ते अडीच महिन्यांपासुन बेपत्ता होते. या संदर्भात त्यांची पत्नी लताबाई हिने ११ फेब्रुवारी २०२० रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात तशी खबर दिली होती. मात्र या घटनेचा उलगडा शनिवारी झाला.

मयताचा मोठा भाऊ किसन पोमा चव्हाण याने लताबाईस विश्वासात घेऊन बेपत्ता नामदेव बद्दल माहिती विचारली तेंव्हा मोठ्या मुलाने त्यांना मारून टाकल्याचे दोन दिवसांपूर्वीच सांगीतल्याचे सांगीतले. त्यानंतर मुलास विचारले तेंव्हा त्याने याबाबत कबुली दिली. वडीलांना दारू पिण्याची सवय होती. ते नेहमीच दारू पिऊन घरी येत. आई लताबाई बरोबर भांडण झाल्याने ती गावाला निघुन गेली होती.

घरात आम्ही दोघे भाऊ व बहीण होतो. वडील नेहमीप्रमाणे २२ डिसेंबर २०१९ रोजी दारू पिऊन घरी आले व शिवीगाळ करू लागले. त्यामुळे लहान बहीण व भाऊ घरातुन बाहेर पळाले. वडिलांनी कुऱ्हाड घेऊन मला मारण्याचा प्रयत्न केला पण दारू जास्त पिलेले असल्याने त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. मी घरातील काठीने त्यांच्या मानेवर प्रहार केला. ते बेशुध्द पडल्याचे पाहुन घरातील कासऱ्याने त्यांचा गळा आवळला. त्यानंतर घरातील पलंग बाजुला सरकवुन खड्डा खणला व प्रेत खड्डयात टाकून बुजून टाकले व परत शेणाने सारवून घेतले. अशी माहिती आरोपी विधी संघर्ष बालकाने पोलीसांसमोर दिली.ही घटना ऐकून पोलीसही सुन्न झाले. त्यांनी तहसिलदार यांना पत्र देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. अद्याप पोलीस ठाण्यात कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नाही.

Web Title: A minor boy killed his father and buried his body in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.