Maharashtra Election 2019 : मतदार ओळखपत्र हरवले आहे ?'टेंशन' नाही, 'ही' ११ कागदपत्रे ठरतील ओळखीचा पुरावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 03:58 PM2019-10-19T15:58:05+5:302019-10-19T16:00:52+5:30

Maharashtra Election 2019: खालील कागदपत्रे दाखवून करा मतदानखालील कागदपत्रे दाखवून करा मतदान

Maharashtra Election 2019: Voter ID Card Lost? No 'tension';go with 'these' ID proofs | Maharashtra Election 2019 : मतदार ओळखपत्र हरवले आहे ?'टेंशन' नाही, 'ही' ११ कागदपत्रे ठरतील ओळखीचा पुरावा 

Maharashtra Election 2019 : मतदार ओळखपत्र हरवले आहे ?'टेंशन' नाही, 'ही' ११ कागदपत्रे ठरतील ओळखीचा पुरावा 

googlenewsNext

औरंगाबाद : मतदानासाठी मतदान केंद्रावर गेल्यावर सगळ्यात अगोदर मतदारांचे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र मागितले जाते. पण काही कारणामुळे जर मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल तर केवळ एवढ्याच कारणासाठी मतदान करणे टाळू नका. कारण जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त खालील ११ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहेत. 

भारत निवडणूक आयोगाद्वारे यापूर्वी छायाचित्रासह मतदार चिठ्ठी (फोटो व्होटर्स स्लिप) मतदाराची ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते. मतदार ओळखपत्राचे वाटप सर्वदूर न झाल्यामुळे त्याऐवजी ही चिठ्ठी वापरली जात होती. परंतु आता मतदारांना मोठ्या प्रमाणावर छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता मतदार चिठ्ठी मतदाराचे ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे.

मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे शक्य नसल्यास मतदारांनी या पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.

पुढील कागदपत्रांपैक्की एक दाखवून मतदान करता येऊ शकते :
१.पासपोर्ट 
२.वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) 
३. केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनी याठिकाणचे कर्मचारी असल्यास तेथील ओळखपत्र. 
४बँक किंवा पोस्ट कार्यालयातून वितरित करण्यात आलेले छायाचित्र असलेले पासबुक. 
५.पॅनकार्ड. 
६. रजिस्ट्रार जनरल आॅफ इंडिया यांच्यातर्फे  नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित केलेले स्मार्ट कार्ड. 
७. मनरेगांतर्गत निर्गमित जॉब कार्ड. 
८. भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड. 
९. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र. 
१०. खासदार, आमदारांचे अधिकृत ओळखपत्र. 
११. आधारकार्ड. 

Web Title: Maharashtra Election 2019: Voter ID Card Lost? No 'tension';go with 'these' ID proofs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.