Lokmat Mahamarathon: Those who do not run will also be given contributions to marathon | लोकमत महामॅरेथॉन : धावणार नाहीत त्यांनाही देता येणार महामॅरेथॉनमध्ये योगदान
लोकमत महामॅरेथॉन : धावणार नाहीत त्यांनाही देता येणार महामॅरेथॉनमध्ये योगदान

ठळक मुद्दे ‘लोकमत महामॅरेथॉन’ आता अवघ्या ५ दिवसांवर आली आहे. धावपटूंचा उत्साह द्विगुणीत करणे हासुद्धा महामॅरेथॉनचा एक भाग

औरंगाबाद : महाराष्ट्रातील धावपटूंना ज्या स्पर्धेची प्रतीक्षा लागून राहिली आहे ती ‘लोकमत महामॅरेथॉन’ आता अवघ्या ५ दिवसांवर आली आहे. येत्या १५ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे पहाटे सुरू होणाऱ्या या महामॅरेथॉनसाठी हजारो धावपटूंनी कसून सराव केला आहे. प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये धावून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे धावपटू आता सज्ज झाले आहेत. लोकमत समूहाच्या पुढाकाराने व धूत ट्रान्समिशन प्रस्तुत महामॅरेथॉनमध्ये सहभागी न होऊ शकलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील शहरवासीयांना नाराज होण्याचे कारण नाही. तुम्हीदेखील तेवढ्याच उत्साहाने या महामॅरेथॉनमध्ये आपले योगदान देऊ शकता. ही महामॅरेथॉन ही औरंगाबादच्या प्रत्येक नागरिकांची आपली महामॅरेथॉन आहे.

महामॅरेथॉनमध्ये धावण्याबरोबरच धावपटूंचा उत्साह द्विगुणीत करणे हासुद्धा महामॅरेथॉनचा एक भाग आहे आणि तो संपूर्ण शहराला पूर्ण करावयाचा आहे. या स्पर्धेत आपलाही सक्रिय सहभाग असणे फार आवश्यक आहे. तो कसा घ्यायचा यासाठी काही ‘आयडिया’ देत आहोत. जे तरुण काही कारणास्तव मॅरेथॉनमध्ये धावू शकणार नाहीत त्यांनी घरी शांत बसू नये. युवक-युवती चेहऱ्यावर रंग लावून, फेटे बांधून, आकर्षक पेहराव करून महामॅरेथॉनच्या मार्गावर येऊ शकतात. तारुण्याचा सळसळता उत्साह धावण्याबरोबरच प्रोत्साहन देण्यातही दिसावा. गतवर्षी महामॅरेथॉनमध्ये शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला होता तो प्रशंसनीयच होता. सलग तीन वर्षे औरंगाबादकरांचे मनापासून प्रेम मिळाल्याने लोकमत महामॅरेथॉन लोकप्रियतेचे शिखर यशस्वीपणे गाठत आहे. तर मग औरंगाबादकरांनो १५ डिसेंबर रोजी रविवारी पहाटे घराबाहेर येऊन महामॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या रनर्सला ‘चिअर अप’ करा. 

औरंगाबादकरांनो वाढवा रनर्सचा उत्साह
१जे शहरवासीय मॅरेथॉनमध्ये धावणार नाहीत ते आपल्या घराबाहेर येऊन महामॅरेथॉन मार्गावर उभे राहून धावणाऱ्यांचा उत्साह वाढवू शकतात. तुमच्या प्रोत्साहनाचे शब्द धावपटूंचा उत्साह व ऊर्जा द्विगुणित करतील. त्यांना छोट-छोट्या पेपर ग्लासमध्ये सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस, लिंब सरबत असे पेयसुद्धा आपण देऊ शकता.२मॅरेथॉन मार्गावर ढोल-ताशा, गाणे-संगीत वाजवून, लेझीम खेळून जल्लोषपूर्ण वातावरण तयार करू शकता. सकाळच्या गुलाबी थंडीत धमाल मस्तीवाले वातावरण असेल तर मॅरेथॉनपटूंचे पाय आणखी वेगाने धावू लागतील. तसेच यानिमित्त बाहेर येणाऱ्या धावपटूंना औरंगाबादकरांचे आदरातिथ्य अनुभवण्याची संधी असेल.३विशेषत: शाळकरी मुलांनी व्यायाम आणि आरोग्याची प्रेरणा घेण्यासाठी सकाळी लवकर उठून मॅरेथॉन मार्गावर उपस्थित राहून मोठ्या उत्साहात धावपटूंचे मनोबल वाढवावे. तुमच्यासोबत आपल्या कुटुंबाला आणि मित्र परिवारालाही सोबत आणा. पालकांनीदेखील आवर्जून मुलांना घेऊन यावे.४रांगोळीचे आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून धावपटूंच्या स्वागतासाठी आपणही महामॅरेथॉन मार्गावर कडेला आकर्षक रांगोळी काढून सजावट करू शकता. रांगोळीतून आरोग्य आणि सामाजिक संदेश दिला तर अधिक उत्तम. संपर्कसाठी 9420922022.

मॅरेथॉनसाठी नोंदणी : रिगल लॉन, लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद 
येथे करता येईल.अधिक माहितीसाठी 9145711777, 9075098036,
9004711378, 9673595595 या क्रमांकांवर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी फेसबुकवर महामॅरेथॉन पेजला भेट द्या. 

Web Title: Lokmat Mahamarathon: Those who do not run will also be given contributions to marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.