'चहा प्यायला जावू, म्हणून नेले केली मारहाण'; भाजपच्या केंद्रे यांची शिवसेनेच्या जंजाळ यांच्याविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 01:51 PM2021-07-27T13:51:24+5:302021-07-27T14:01:38+5:30

Shivsena Vs BJP : लसीकरण केंद्रावर सोमवारी टोकन मिळण्याच्या वादातून भाजप ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष प्रा. गोविंद केंद्रे आणि युवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ समर्थकांमध्ये जोरादार सोमवारी दुपारी जोरदार राडा झाला होता.

'Inviting for tea, then beaten'; Police Complaint of BJP's Prof. Govind Kendre against Shiv Sena's Rajendra Janjal | 'चहा प्यायला जावू, म्हणून नेले केली मारहाण'; भाजपच्या केंद्रे यांची शिवसेनेच्या जंजाळ यांच्याविरोधात तक्रार

'चहा प्यायला जावू, म्हणून नेले केली मारहाण'; भाजपच्या केंद्रे यांची शिवसेनेच्या जंजाळ यांच्याविरोधात तक्रार

Next
ठळक मुद्देभाजप ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष प्रा. गोविंद केंद्रे यांची पोलिसांत तक्रारयुवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळसह सात जणांवर गुन्हा

औरंगाबाद: विजयनगर-मेहरनगर येथील महापालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रावर टोकन मिळण्यातून शिवसेना- भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सोमवारी झालेल्या राड्याप्रकरणी अखेर मध्यरात्री युवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळसह सात कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. राजेंद्र जंजाळ यांनी आपण चहा प्यायला जाऊ,असे म्हणून कारमधून रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात नेले आणि तेथे बेदम मारहाण केल्याची तक्रार भाजप पदाधिकारी प्रा. गोविंद केंद्रे यांनी जवाहरनगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. यावरून पोलिसांनी जंजाळ यांच्यासह अमोल पाटे, आकाश राऊत आणि अन्य तीन ते चार कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविला. ( Police Complaint of BJP's Prof. Govind Kendre against Shiv Sena's Rajendra Janjal ) 

या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, लसीकरण केंद्रावर सोमवारी टोकन मिळण्याच्या वादातून भाजप ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष प्रा. गोविंद केंद्रे आणि युवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ समर्थकांमध्ये जोरादार सोमवारी दुपारी जोरदार राडा झाला होता. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या प्रा. केंद्रे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी प्रा. केंद्रे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, सोमवारी ते मनपा लसीकरण केंद्रावर गेले असता आठ दिवसांपासून जंजाळ यांचे आठ ते दहा कार्यकर्ते ओळखीच्या लोकांना रांगेत उभे करत होते. लसीकरण केंद्रावर पान, तंबाखू खाऊन थुंकणे, गोंधळ करणे असे प्रकार करत होते. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी हे लसीकरण केंद्र तुमच्या बापाचे आहे का ? आम्ही काहीही करू,  तुम्ही आम्हाला बोलणारे कोण ? आम्ही जंजाळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत असे म्हणून बाचाबाची करण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका कार्यकर्त्याने जंजाळ यांना फोन करून बोलावून घेतले. काही वेळात तेथे आलेल्या जंजाळ यांनी आपण चहा प्यायला जाऊ असे म्हणून कारमध्ये बसवून रोहयो मंत्री भुमरे यांच्या कार्यालयात नेले. मंत्री कामात असल्याने कार्यालयाबाहेर उभा असताना अचानक कुणीतरी मागून पाठीत दोन चार बुक्के मारले. त्याचवेळी समोर उभा असलेल्या अनोळखी व्यक्तीने शिवीागाळ करून चार ते पाच चापटा कानाखाली मारल्या. यामुळे चक्कर येऊन पडलो. यानंतर कुणीतरी आपल्याला रुग्णालयात दाखल केल्याचे केंद्रे यांनी तक्रारीत नमूद केले.

या कलमानुसार गुन्हा
या तक्रारीच्या आधारे जवाहरनगर पोलीस ठाण्यात जंजाळ यांच्यासह कार्यकर्त्यांवर भादंवि कलम १४३,१४७,१४९ (दंगल करणे), कलम ३२३,३२४( मारहाण करून गंभीर दुखापत करणे), ५्र५, ५०६(जीवे मारण्याची धमकी देणे) , कलम १३५(गैर कायद्याची मंडळी जमविणे )आदी कमलानुसार गुन्हा नोंदविला. पेालीस उपनिरीक्षक भरत पाचोळे तपास करीत आहेत.

Web Title: 'Inviting for tea, then beaten'; Police Complaint of BJP's Prof. Govind Kendre against Shiv Sena's Rajendra Janjal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app