संचिका झाल्या रंगारंग; महापालिकेच्या कारभारात ‘महसुली’ रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 07:53 PM2020-01-17T19:53:36+5:302020-01-17T19:55:58+5:30

खाकीऐवजी संचिकांना वेगवेगळे रंग देण्याचे आयुक्तांचे आदेश 

The file becomes colorful; The 'revenue' color during the administration of the municipality of Aurangabad | संचिका झाल्या रंगारंग; महापालिकेच्या कारभारात ‘महसुली’ रंग

संचिका झाल्या रंगारंग; महापालिकेच्या कारभारात ‘महसुली’ रंग

googlenewsNext
ठळक मुद्देमनपात विभागनिहाय संचिकांचा रंग वेगवेगळा असणार आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी महसूल कामकाजाच्या धर्तीवर विविध विभागांच्या संचिकांना रंगांचे कोड देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमध्ये बस्त्यांमध्ये संचिका असतात. त्यांना विशिष्ट रंगांच्या कपड्यात गुंडाळलेले असते, तर आता मनपात विभागनिहाय संचिकांचा रंग वेगवेगळा असणार आहे. 

महापालिकेत संचिकांचा ढीग दिवसेंदिवस वाढत आहे. त्या ढिगातील संचिका एकाच रंगाच्या असल्याचे दिसून आल्यामुळे कोणत्या विभागाची संचिका कोणती आहे हे शोधण्यात बराच कालावधी जातो. त्यामुळे आयुक्तांनी विभागनिहाय संचिका रंगीत कव्हरच्या असाव्यात याबाबत आदेश काढले आहेत. मनपाच्या तिजोरीत उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे अनेक कामांच्या संचिका तुंबल्या आहेत. त्या तुंबलेल्या संचिकांतून विभागातील कर्मचारी मर्जीतील संचिका बरोबर बाहेर काढून ती मंजूर करून आणतात. यामुळे पालिकेच्या कारभारात सुसूत्रता राहिलेली नाही. आजवर संचिकांचा रंग खाकी होता. मात्र, आता अधिकाºयांच्या टेबलवर विशिष्ट रंगांच्या संचिकाच पाहायला मिळेल.  

असे आहे अभिलेखांचे वर्गीकरण
महसूल प्रशासनात कायम बस्त्यांचा रंग लाल असतो. ३० वर्षे जुन्या बस्त्यांचा रंग हिरवा असतो. १० वर्षे जुन्या बस्त्यांचा रंग पिवळा असतो. १ ते ५ वर्षांतील बस्त्यांचा रंग पांढरा असतो. महसूलमध्ये जरी संचिका एकाच रंगाच्या असल्या तरी अभिलेखांमध्ये वर्गीकरण करताना वरील रंगांचा कपडा वापरण्यात येतो. त्याबाबतची शक्यता पडताळून आयुक्तांनी मनपात विभागनिहाय संचिकांना विविध रंगांचे कोड देण्याचे ठरविले आहे. या संचिका जेव्हा अभिलेख कक्षात जातील, तेव्हा त्या सहज उपलब्ध होतील, असा त्यामागील उद्देश असू शकतो. 


अनेक संचिका अर्धवट
आयुक्त पाण्डेय यांनी संचिकांची तपासणी केली असता त्यांना अधिकारी आळशीपणाने संचिका हाताळत असल्याचे लक्षात आले आहे.संचिकांमध्ये अपूर्ण टिप्पणी लिहिणे, त्यानुसार पत्रव्यवहाराची नोंद न ठेवणे, स्वाक्षरीखाली नाव व पदनामाचा उल्लेख तारखेसह नसणे, तांत्रिक बाबींमध्ये अक्षरांची मांडणी सुरळीत न करणे, अधिकाºयांनी काय शेरा मारला आहे, हे स्पष्टपणे दिसत नाही. अशा काही नोंदी आयुक्तांनी पत्रात नमूद केल्या आहेत. 


विभागनिहाय संचिकांचे रंग असे असतील
विभागाचे नाव    संचिकांचा रंग 
नगररचना    फिकट निळा 
पाणीपुरवठा     निळा 
आरोग्य विभाग    लाल
रस्ते    पिवळा 
विद्युत    विटकरी 
कर वसुली    पोपटी 
ड्रेनेज    नारंगी  
अग्निशमन    हिरवा 
घनकचरा    जांभळा 
महिला-    अबोली 
बालकल्याण
एनयूएलएम        फिकट ग्रे 
मालमत्ता    फिकट पिवळा 
उद्यान         मोरपंखी 
पशुधन    फिकट हिरवा 
विधि    फिकट आकाशी 
शिक्षण    राणीरंग 
आस्थापना-१    गुलाबी 
आस्थापना-२    तपकिरी 
क्रीडा    मेहंदी 
सांस्कृतिक    गडद आकाशी 
जनसंपर्क     नेव्ही ब्ल्यू 
संगणक    फिकट जांभळा 
घरकुल    गडद ग्रे 
निवडणूक     पांढरा 
उर्वरित    खाकी 
 

Web Title: The file becomes colorful; The 'revenue' color during the administration of the municipality of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.