CoronaVirus: Balapur village helps other states laborers; the villagers feeds 100 people a day | CoronaVirus : परप्रातीय मजूरांसाठी बाळापूर गाव सरसावले; ग्रामस्थांकडून रोज १०० जणांना जेवण

CoronaVirus : परप्रातीय मजूरांसाठी बाळापूर गाव सरसावले; ग्रामस्थांकडून रोज १०० जणांना जेवण

ठळक मुद्देसर्व ग्रामस्थ करतात जेवण जमा

-सुनील गिऱ्हे
औरंगाबाद : भालगाव फाट्यावरील महाविद्यालयात आश्रयाला आलेल्या १०२ मजूरांना बाळापूर येथील ग्रामस्थ रोज सकाळी जेवण पूरवित आहेत. लॉकडाऊन असेपर्यंत मजूरांना अन्न पुरविण्याचा संकल्प गावक-यांनी केली आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन केल्यानंतर काही मजूर पायीच आपल्या गावी निघाले होते तर काहींना निवारा नसल्याने पोलीस प्रशासनाने शहरातील विविध भागातल्या परप्रांतीय १०२ मजूरांची भालगाव फाटा परिसरातील शिवा ट्रस्टच्या यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालयात निवासाची व्यवस्था केली. या मजूरांमध्ये पाच महिला, १२ लहान मुले आणि ८५ पुरूषांचा समावेश आहे. २८  मार्च रोजी रात्री आलेल्या मजुरांची सुरूवातीला शिवा ट्रस्टच्या वतीने डॉ. बाळासाहेब पवार यांनी जेवनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर किचनचंद तणवानी, पोलीस उपायुक्त राहुल खाडे, एस.पी जवळकर यांनी यांच्यासह काही सामाजिक संस्थांनी जेवनाची व्यवस्था केली.
  
३१ मार्च रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि. महेश आंधळे यांनी बाळापूर येथील ग्रामस्थांना मजूरांच्या जेवनाची व्यवस्था करण्यासंदर्भात विचारणा केली. त्यास गावक-यांनी होकर देत रोज १०२ नागरिकांना जेवन पुरविण्याचा शब्द दिला.

 मजुरांना सकाळी बाळापूर ग्रामस्थांच्यावतीने जेवन देण्यात येत आहे. यासाठी गावात दवंडी देऊन या मजूरांना १४ तारखेपर्यंत जेवन पुरविण्याबात माहिती देण्यात आली. त्यामुळे रोज सकाळी येथील मारूती मंदिरासमोर नागरिक ज्वारी, बाजारी, तसेच गव्हा पोळ्या जमा करतात. तसेच एका पाण्याच्या टाकीत भाजी एकत्र करण्यात येते. त्यासोबत लोणचे, मिरचीचा ठेचा त्याचबरोबर शेंदाण्याची चटणी देण्यात येत असून रोज पोटभर जेवन मिळत असल्याने या मजूरांनी बाळापूर ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.
 
रोज हे जेवन पोहोच करण्याची व्यवस्था गांधेली येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर धनाजी तळेकर हे करीत असून आता पाचोडचे माजी उपसरपंच बाबासाहेब घोडके तसेच निपाणी येथूनही मजूरांना सायंकाळी जेवन देण्यात येत असून इतर गावांचाही सहभाग वाढत आहे. मजूरांना जेवन देण्याची इच्छा असेल त्यांनी चिकलठाणा पोलीस ठाणे, शिवा ट्रस्ट
तलाठी, किंवा तहसीलदारांशी संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे. 

तहसीलदार, तलाठी, पोलीस ठाण मांडून 
-ज्या ठिकाणी या मजूरांची व्यवस्था करण्यात आली आहे तिथे तहसीलदार के. कानगुले तलाठी योगेश पंडीत हे रोज पाहणी करून आढावा घेत असून या ठिकाणी चिकलठाणा ठाण्याचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रोज येथे भेट देणाºया अधिकारी, कर्मचाºयांची तसेच सामाजिक संस्थांची नोंद करण्यात येत आहे. 

आरोग्य विभागाकडून तपासणी 
-येथील मजूरांची पिंप्रीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वेळोवेळी तपासणी करण्यात येत असून यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशांत दाते, डॉ. रुबिना शेख या पुढाकार घेत आहे. त्यांना शिवा ट्रस्टचे अनिल झाल्टे, रमेश राठोड, डॉ. संदीप कांबळे आदींचे सहकार्य लाभत आहे. 

मजूरांना मदतीचा ओघ सुरूच 
- येथे शंभरहुन अधिक मजूर असल्याची माहिती मिळताच सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, शाळा, महाविद्यालय, पोलीस अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक यांच्याकडून सदर मजूरांना कोलगेट, टुथब्रश, अंगाचा साबण, कपड्याचा साबण, तेल तसेच टावेल देण्यात येत असून येथे सर्वोत्तम व्यवस्था होत असल्याने मजूरांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रशासनानेही पाठविला प्रस्ताव 
-भालगाव येथील महाविद्यालयात थांबलेल्या १०२ मजूरांच्या जेवनाची व्यवस्था शासनाकडून व्हावी, यासाठी जिल्हाधिकाºयांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर आणखी एक दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. शासनाचे जेवन येईल तेव्हा येईल. मात्र, आम्ही या मजूरांना लॉकडाऊन संपेपर्यंत जेवन पुरवित राहू असा संकल्प ग्रामस्थांच्या वतीने बाळापूर येथील तंटा मुक्त समिती अध्यक्ष सुभाष पवार, सोयायटी चेअरमन रामराव खाडे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाघ, गणेश वाघ, विठ्ठल वाघ, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य यांनी केला आहे. 


काय असते जेेेवण
- बाळापूर येथील ग्रामस्थांकडून दिलेल्या जाणाºया जेवनात एक पाण्याची टाकी भरून भाजी, दोन कॅरेट ज्वारी, बाजरी तसेच पोळ्या. त्याबरोबर मिरचीचा ठेचा, शेंगदाना चटणी तसेच खारूडी, खांब्याचे घरगुती लोनचे आदीचा समावेश असतो. गावकरी कुणी दोन भाकरी देत तर कुणी चार ते पाच भाकरी आणि दोन डबे भाजी देऊ करीत आहेत. 

Web Title: CoronaVirus: Balapur village helps other states laborers; the villagers feeds 100 people a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.