शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदावरुन जिल्हा परिषदेत आघाडीत बिघाडी

By admin | Updated: September 18, 2014 23:26 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काँग्रेसचे बहुतांश सदस्य तसेच नेते राष्ट्रवादीसोबत

अमरावती : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काँग्रेसचे बहुतांश सदस्य तसेच नेते राष्ट्रवादीसोबत जाण्यास इच्छुक नसल्याने राष्ट्रवादी आणि कॉग्रेस यांच्यातील संभाव्य आघाडी होण्यापूर्वीच बिघाडीची चर्चा जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. अमरावती जिल्हा परिषदेमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व अन्य मित्रपक्षांनी एकत्र येऊन सत्ता मिळविली आहे. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादीने अडीच वर्षे सत्ता उपभोगली आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत.तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काँग्रेसच्या सदस्यांना आणि नेत्यांनाही राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात स्वारस्य नसल्याचे सध्याचे चित्र आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत तुर्तास काँग्रेसची जिल्हा परिषद सदस्यांसोबत चर्चा झालेली नाही. याशिवाय काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबतही याबाबत चर्चा झाल्याची माहिती नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सध्या तरी काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही, असे दिसते. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता असून यात काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.