शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद परिसराने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 01:54 IST

जिल्हा बँकेच्या शाखेलगत असलेल्या खुल्या जागेवर जिल्हा परिषदेतील कर्मचारी व नागरिकांना वाहन पार्क करता येणार आहे. पदाधिकारी व विविध विभागांचे खातेप्रमुख यांची शासकीय वाहने ही आपआपल्या कार्यालयासमोर वा पार्किंगमध्ये उभी केली जातील. प्रत्येक प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

ठळक मुद्देवाहनास प्रवेशबंदी : अस्ताव्यस्त वाहनांचा विळखा दूर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांकडून आतापर्यंत आवारात मिळेल त्या जागेवर अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात होती. याचा फटका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाही सहन करावा लागत होता. या पार्किंगला शिस्त लावण्याचे फर्मान जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सोडताच मंगळवारपासून ‘मिनी मंत्रालया’त वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली. यामुळे बरेच कालावधीनंतर या आवाराने मोकळा श्वास घेतला.जिल्हा परिषदेत आतापर्यंत मिळेल त्या ठिकाणी वाहने लावली जातात. वाहनांची संख्या अधिक झाली आणि एखादा चालक वाहन लावून गेला की, आधीचे वाहन काढणे अवघड होते, अशी स्थिती अनेकदा येते. जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती आणि आरोग्य, बांधकाम, महिला व बाल कल्याण, पशुसंवर्धन आदी विभागांच्या अधिकाऱ्यांच्या दालनापुढे लागणाऱ्या अस्ताव्यस्त तसेच निकामी झालेल्या वाहनांचा फटका पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांनाही सहन करावा लागतो. ही अव्यवस्था सुधारण्याच्या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागामार्फत बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार पार्र्किंग व परिसर स्वच्छतेची अंमलबजावी मंगळवारपासून सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या परिसरात पदाधिकारी व अधिकारी, सदस्य वगळता अन्य वाहने आत आणण्यास मनाई करण्यात आली आहे. परिणामी मंगळवारी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, अभ्यागतांना आपली वाहने पर्यायी ठिकाणी ठेवावी लागली. काहींनी प्रवेशद्वाराला खेटून रस्त्यालगत वाहन उभी केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.मोकळ्या जागेत पार्किंगजिल्हा बँकेच्या शाखेलगत असलेल्या खुल्या जागेवर जिल्हा परिषदेतील कर्मचारी व नागरिकांना वाहन पार्क करता येणार आहे. पदाधिकारी व विविध विभागांचे खातेप्रमुख यांची शासकीय वाहने ही आपआपल्या कार्यालयासमोर वा पार्किंगमध्ये उभी केली जातील. प्रत्येक प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद