शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

यशोदानगर चौक की, फ्रुटमार्केट ?

By admin | Updated: March 11, 2016 00:22 IST

शहरातील अन्य रस्त्यांप्रमाणे यशोदानगर चौक आणि परिसराला अघोषितपणे फ्रुटमार्केटचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

यंत्रणेचे दुर्लक्ष : कारवाईची अपेक्षा, वर्षभरापूर्वी झाली होती हत्याअमरावती : शहरातील अन्य रस्त्यांप्रमाणे यशोदानगर चौक आणि परिसराला अघोषितपणे फ्रुटमार्केटचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हा संपूर्ण परिसर हातगाड्यांनी व्यापला आहे. वाढत्या अतिक्रमणाने येथील रस्ते अरुंद बनलेत व पर्यायाने अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. मोतीनगर चौकातून पुढे यशोदानगर चौकाच्या २०० मीटर आधिपासूनच अगदी रस्त्यावर हातगाड्या लागतात. येथे फळांसह भाजीपाला व तत्सम पदार्थ विकणाऱ्यांची भाऊगर्दी आहे. या चौकातील हार्डवेअर दुकानांसह अनेक प्रतिष्ठानांनी रस्त्यावर अतिक्रमण थाटत दुकानातील साहित्य रस्त्यावर सजविले आहे. या रस्त्यावरील पानटपरीसह मांसविक्रीचे दुकान व अन्य विविध वस्तू विक्रीच्या दुकानदारांनी रस्त्यावर कब्जा मिळविला आहे. वर्षभरापूर्वी झाली होती हत्याया रस्त्यावरील अतिक्रमणातील पानटपरीवरून झालेल्या वादात गतवर्षी एका तरुणाचा मुडदा पडला होता. या घटनेनंतर येथील अतिक्रमण पालिकेच्यावतीने हटविण्यात आले. मात्र आज परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पोलिसांच्या समक्ष अतिक्रमणयशोदानगर चौकात फ्रेजरपुरा पोलिसांची चौकीसुद्धा आहे. या भागात वाहतूक पोलीससुद्धा तैनात असतात; तथापि त्यांच्या डोळ्यासमोर खुलेआमरीत्या अडाणेश्वर मंदिरापर्यंत व पुढे अतिक्रमण केल्या जाते. या चौकात अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात. यशोदानगरकडून दस्तुरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर हातगाड्यांच्या रांगा लागत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरुन वाहन चालवावे लागत असल्याचे चित्र आहे. प्रतिष्ठानांसमोर अवैध पार्किंगशहरातील अन्य भागांप्रमाणे यशोदानगर, दस्तुरनगर भागातील मोठमोठ्या प्रतिष्ठानांसह व्यावसायिक संकुलाला पार्किंगची जागाच नाही. एकतर दुकानातील नानाविध साहित्य बाहेर ठेवून अतिक्रमण केले गेले आहेत. त्यासमोर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागत असतात. वाहतूक पोलीस व मनपा यंत्रणा ढिम्म आहे. या रस्त्यांवर अवैधपणे सार्वजनिक जागांवर कब्जा करुन पानटपऱ्या लावण्यात आल्या आहेत. याखेरीज प्लायवूड व लाकडी सजावट करणाऱ्यांनीही अतिक्रमण केले आए्य.. पोलिसांच्या सहकार्याने पालिकेने या भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.