बेलपुरा येथे युवकाला लाथाबुक्क्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST2021-02-06T04:21:02+5:302021-02-06T04:21:02+5:30

अमरावती : बेलपुरा येथील काहींनी तेथील एका युवकाला डोक्यावर लाकडी राप्टरने तसेच लाथाबुक्क्यांनीही मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. राजेश ...

Youth beaten with lathabukka at Belpura | बेलपुरा येथे युवकाला लाथाबुक्क्याने मारहाण

बेलपुरा येथे युवकाला लाथाबुक्क्याने मारहाण

अमरावती : बेलपुरा येथील काहींनी तेथील एका युवकाला डोक्यावर लाकडी राप्टरने तसेच लाथाबुक्क्यांनीही मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. राजेश जाधव व अन्य एक युवक असे आरोपीचे नाव आहे फिर्यादी नीलेश प्रल्हाद मदने (३०) यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली.

--------------------------------------------------

ग्रामीण पोलीस मुख्यालयातून दुचाकी लंपास

अमरावती : ग्रामीण पोलीस मुख्यालयात पार्क केलेली दुचाकी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घना २६ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी गुरुवारी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अभय दत्तात्रय लंगरे (४९, रा. धामणगाव रेल्वे) यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच २७ एजी ५७११) लंपास करण्यात आली.

-------------------------------------------------

फ्रेन्ड्स कॉलनीतून सिलिंडर लंपास

अमरावती : घराच्या व्हरांड्यात ठेवलेले गॅस सिलिंडर अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना बुधवारी घडली. राजेंद्र ज्ञानेश्वर टाके (५२, रा. फ्रेन्ड्स कॉलनी) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

--------------------------------------------------------

अनोळखी वृद्धेचा मृतदेह आढळला

अमरावती: गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत ७० वर्षीय एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला.

----------------------------------------

Web Title: Youth beaten with lathabukka at Belpura