शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नरबळीची पूजा, डोळ्यावर पट्टी अन् डोक्याखाली वीट !

By admin | Updated: September 4, 2016 00:11 IST

प्रथमेशचा नरबळी देण्यापूर्वी त्याला नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेण्यात आले.

भयंकर : विषारी नागालाही पूजणे ही आमची संस्कृती !अमरावती : प्रथमेशचा नरबळी देण्यापूर्वी त्याला नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेण्यात आले. तेथे त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. तत्पपूर्वी पूजेची तयारीही करण्यात आली होती. शंकर महाराजांच्या आश्रमात नागपंचमीला घडलेले हे भयंकर वास्तव 'लोकमत'च्या शोधमोहिमेत पुढे आले आहे. नागपंचमीच्या दिवशी निरागस प्रथमेश मनोमन आई-बाबांच्या प्रतीक्षेत असताना त्याला दगा करून नवीन इमारतीच्या वरच्या माळ्यावर नेण्यात आले. प्रथमेशला जेथे नेण्यात आले तेथे नजीकच स्वच्छगृह बांधण्यात आले आहे. स्वच्छतागृहाजवळ प्रथमेशला नेण्यापूर्वी गोलाकार रांगोळी काढण्यात आली होती. तेथे पूजेची तयारी केलेली होती. चिमुकल्या प्रथमेशच्या डोळ्यावर कापडाची पट्टी बांधण्यात आली. त्याचे हात आणि पाय बांधण्यात आलेत. त्यानंतर त्याच्या गळ्यावर ब्लेडचे वार करणे सुरू झाले. प्रथमेशला ठार मारण्यात कुठलीही कसूर राहू नये यासाठी त्याच्या गळ्यावर पुन्हा दोनदा वार केले गेले. पहिल्यांदा गळा कापला त्यावेळी प्रथमेश कमालीचा तडफडला. म्हणूनच पुन्हा दोनदा गळा चिरला गेला. बळी दिला जाणाऱ्या प्रथमेशचा पूर्ण जीव जावा हा उद्देश दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा वार करण्यामागे होता. प्रथमेशच्या शूरपणाला सलामअमरावती : एकदा प्रथमेशने हाताने वार अडविण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु तीनदा गळा चिरल्यावर इवलासा जीव निपचित पडला. प्रथमेश संपलाच, अशी खात्री बाळगून विटेवर त्याचे डोके ठेवून, प्रथमेशला आडवे ठेवले गेले. नरबळीसाठीच्या विधीत, पूजेत मारेकरी मग्न झालेत. त्यांची पूजा सुरू असताना काही वेळाने प्रथमेशला चेतना आली. जे घडले ते त्याला कळले होते. आताही आपण जीव वाचवू शकतो, अशी दृढ इच्छा त्याच्या रोमारामात संचारली. अर्धी चिरलेली मान आणि भरपूर रक्तस्त्राव झालेल्या स्थितीत प्रथमेश सामान्य स्थितीत चालावा तसा चालू शकणार नव्हताच. तरीही त्याने सारी चेतना एकवटली. तो उठून बसला. भिंतीला दोन्ही हात टेकवून बसत, पडत तो घटनास्थळावरून हळूहळू सरकू लागला. या भयंकर अवस्थेत इवलासा प्रथमेश स्वत:चा चिरलेला गळा घेऊन, मारेकऱ्यांची नजर चुकवून खाली उतरण्याची धडपड करतो- या त्याच्या शूरपणाला खरे तर आम्हा सर्वांनी सलामच ठोकायला हवा! समयसूचकतेमुळे आणि कमालीच्या धैर्यामुळे प्रथमेश मारेकऱ्यांच्या हातातून निसटला. नंतर तो एका विद्यार्थ्याला दिसल्यामुळे अवघे बिंग फुटले. नागपंचमीच्या सणाला, जेव्हा विषारी नागाचीही आम्ही पूजा करतो, त्याच दिवशी शंकर महाराजांच्या आश्रमात मनुष्याचे निरागस पोर कापून शक्ती उपासनेसाठीची पूजा केली जात होती. किती भयंकर हे!