शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

राष्ट्रीय निवृत्ती योजनेवर गुरुवारपासून कार्यशाळा

By admin | Updated: January 6, 2016 00:17 IST

जानेवारी, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्यात केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.

शासनादेश : कर्मचाऱ्यांनाही देणार प्रशिक्षणअमरावती : जानेवारी, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्यात केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना डीसीपीएस क्रमांक देण्यात आला आहे. प्रत्येक महिन्यात वेतन देयकातून कर्मचाऱ्यांचे स्वत:चे १० टक्के अंशदान कपात करून त्यांच्या खाती व त्याची नोंद घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रती महिना राज्य शासन सुद्धा कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस खात्यात जमा करते.राज्य शासनाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे नामकरण (डीसीपीएस) चे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस) असे करण्यात आले आहे. या संदर्भात केंद्र शासनाने स्थापित केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना विश्वस्त मंडळ (एनपीएस ट्रस्ट) यांच्याबरोबर तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (सीआरए) म्हणून मे.एन.एस.डी.एल. इंन्फ्रास्ट्रक्चर यांच्याशी १० नोव्हेंबर २०१४ रोजी शासनाने करार केला आहे.त्यानुसार आता सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अंशदान केंद्र शासनाने ठरवुन दिलेल्या विश्वस्त बँकेकडे पाठविण्यात येत आहे. तथापी या योजनेविषयी अधिकारी व कर्मचारी यांना पुरेशी माहिती नसल्याने सभ्रम निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे आपली किती रक्कम कपात झाली व शासनाचे किती अंशदान प्राप्त झाले या विषयी बऱ्याच कर्मचाऱ्यांना माहिती नाही. याबाबत जमा रक्कमेचे विवरणपत्र वर्षनिहाय जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती यांनी सर्व शासकीय कार्यालयांना उपलब्ध करुन दिले आहे. मात्र बऱ्याच कार्यालयांनी ते कर्मचाऱ्यांना दिलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी कोषागार कार्यालयामध्ये प्राप्त होत आहे. या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने ७ ते १६ जानेवारीपर्यंत प्रशासकीय विभागनिहाय कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यालयातील वेतन देयक बनविणारा एक कर्मचारी व आस्थापनाविषयक कामकाज करणारा एक कर्मचारी यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे काही कर्मचाऱ्यांच्या विवरणपत्रात मिसिंग रक्कम असल्यास त्या दुरुस्त करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ते सर्व दस्तावेज घेऊन उपस्थित रहावे. ही कार्यशाळा सहसंचालक, लेखा व कोषागार, अमरावती यांच्या विद्यापिठ रोडवरील कार्यालयात होणार आहे.