शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

युवतींनो सावधान : फसू नका, प्रेमजाळ्याचे लोण ग्रामीण भागातही !

By admin | Updated: March 14, 2015 00:36 IST

विशिष्ट समाजातील युवकांनी युवतींना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळ्यात फसविण्याचा प्रकार ...

श्यामकांत पाण्डेय  धारणीविशिष्ट समाजातील युवकांनी युवतींना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळ्यात फसविण्याचा प्रकार हेतुपुरस्सरपणे सुरु केल्याची उदाहरणे समोर येत आहेत. यामुळे जागरूक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत केवळ शहरांपुरतेच मर्यादित असलेले हे लोण हल्ली ग्रामीण भागातही पसरू लागल्याची उदाहरणे आहेत. सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेऊन तरूणींची दिशाभूल करून नंतर त्यांची प्रतारणा करण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असल्याने पालकांसह तरूणींनीही जागरूकता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. आवडत्या व्यक्तिसोबत आयुष्यभर राहण्यासाठी आता शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील तरूणीदेखील पळून जाण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. विशिष्ट समुदायातील तरुण मुले शाळकरी, महाविद्यालयीन तरुणींना हेरुन त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करतात. विवाहदेखील करतात. त्यानंतर मुलींना वाऱ्यावर सोडून पळ काढतात. धर्मप्रसारासाठी हा प्रकार सर्रास सुरू असल्याच्या मुद्यावरून परिसरात गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अन्य धर्माच्या मुलींना फसविण्यासाठी अशा युवकांना पैशांच्या स्वरुपात मोबदला मिळत असल्याचे आरोप आता उघडपणे होत आहे. अशा प्रकरणातील तरुणांचे राहणीमान शंका उत्पन्न करणारे आहे. लग्न झाल्यानंतर पालकही हतबल ठरतात. त्यामुळे मुलींनीच जागरूकता बाळगून भविष्याबद्दल योग्य निर्णय घेण्याची गरज जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत. ग्रामीण परिसरात यादृष्टीने कुठली प्रभावी यंत्रणा उभारता येईल यावर मंथन सुरू आहे.