शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यपशुंच्या तृष्णातृप्तीत उद्यानाचा अडथळा

By admin | Updated: May 19, 2016 00:08 IST

छत्री तलाव मार्गावर सामाजिक वनिकरणाचे जैवविविधता उद्यान वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी अडथळा निर्माण करणारे ठरत आहेत.

छत्री तलाव पाण्याचा मुख्य स्रोत : तारेचे कुंपण तोडण्याचा वन्यप्रेमींचा इशाराअमरावती : छत्री तलाव मार्गावर सामाजिक वनिकरणाचे जैवविविधता उद्यान वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी अडथळा निर्माण करणारे ठरत आहेत. छत्री तलाव हा वन्यप्राण्यांसाठी मुख्य व मोठा स्त्रोत आहे. मात्र, उद्यानासाठी घालण्यात आलेल्या तारेचे कुंपणामुळे वन्यप्राण्यांना तलावावर पाणी पिण्यास जाता येत नसल्याचे वन्यप्रेमींच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे कुंपण त्वरित काढण्यात यावे, अन्यथा तोडण्यात येईल, असा इशारा मधुबन वन्यजीव संररक्षण संस्थेचे नीलेश कंचनपुरे यांनी सामाजिक वनिकरण विभागाला दिला आहे. शहरालगतच्या छत्री तलाव- भानखेड मार्गावरील वनविभागाच्या जागेवर सामाजिक वनिकरणाच्या माध्यमातून स्व.उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान उभारण्याचे काम प्रगतिपथावर सुरु आहे. सद्यस्थितीत या उद्यानाच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. हे उद्यान छत्री तलावकडे जाणाऱ्या मार्गालगत आहे. याच मार्गाने जंगलातील वन्यप्राणी छत्री तलावावर पाणी पिण्यास जातात. मात्र, उद्यानाच्या तारेच्या कुंपणामुळे वन्यप्राण्यांना छत्री तलावावर जात येत नसल्याचे वन्यप्रेमींच्या लक्षात आले आहे. वडाळी वनपरिक्षेत्रातील या जंगलात वाघ, बिबट, तडस, काळवीट, रोही, मोर व पक्षांच्या शेकडो प्रजाती वास्तव्यास आहेत. त्यामुळे बहुतांश वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मुख्य नैसर्गिक स्रोत असलेल्या छत्री तलावावर येतात. सद्यस्थितीत तर उन्हाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंतीसुध्दा करतात. अशावेळीच वणवण भटकणाऱ्या वन्यप्राण्यांना पाण्याच्या स्रोतापर्यंत पोहणेही कठीण झाले आहे. या जंगलात वाघाचेसुध्दा वास्तव्य असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे आता जैवविविधता वाढण्यापेक्षा ती धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वन्यप्राण्याच्या जिवाचा विचार करून संरक्षक कुंपण त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी मधुबन वन्यजीव संरक्षण संस्थेच्या नीलेश कंचनपुरेने केली आहे. जर १० दिवसांच्या आत ही कारवाही न झाल्यास कुंपण तोडण्यात येईल, अशा इशारा कंचनपुरे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)