शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरीला रोखणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : शहरातील उदय कॉलनी परिसरातील वस्तीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या मुख्य वाहिनीवरून अवैध वीजजोडणी घेतल्यामुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.नागरिकांना दैनंदिन जीवनात विजेचा वापर अति आवश्यक झाला आहे. त्यातही विजेचा वापर करून ही एक रूपयाही भरणा न करावा लागत असल्यामुळे उदय कॉलनीतील अनेक ...

ठळक मुद्देखुल्या विद्युत वाहिन्या : वितरण कंपनीचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : शहरातील उदय कॉलनी परिसरातील वस्तीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या मुख्य वाहिनीवरून अवैध वीजजोडणी घेतल्यामुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.नागरिकांना दैनंदिन जीवनात विजेचा वापर अति आवश्यक झाला आहे. त्यातही विजेचा वापर करून ही एक रूपयाही भरणा न करावा लागत असल्यामुळे उदय कॉलनीतील अनेक नागरिकांचे वीज चोरी करण्याचे प्रकार वाढतच चालले आहे. ना कोणाचा धाक ना कोणाची भीती अन् मोफत वीज मिळत असेल तर मीटर घेवून ज्यादा देयके का भरावी असे चित्र सद्या तालुक्यात वीज चोरीचे प्रकार समोर येत आहे. खुलेआम मुख्य रस्त्यावरील विद्युत तारांवर आकोडे टाकून निरंतर वीज चोरीकडे विद्युत वितरण विभागाच्या अधिकाºयांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत.यासोबतच उघड्या डीपी व खुले कनेक्शन हे तालुक्यातील भयावह चित्र निर्माण झाले आहे. नुकत्याच एका शेतकºयाच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. तसेच घराला लागूनच या विद्युत वाहिन्या गेल्याने वर्षभरात १० ते १२ घटना तालुक्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे या वीजचोरी व जिवीतहानीला जबाबदार कोण, असा प्रश्न यावरून उपस्थित होत आहे.कृषी कामाकरिता असलेली वीज जोडणीचा व्यावसायिक उपयोग घेतला जात असल्याच्या तक्रारींचा ढीग असूनही त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. शहरात वीजचोरी होत असून याकडे येथील वीज अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही भागांत वीज अधिकाºयांनी धाडी टाकून धाडसी कारवाया केल्या आहेत.वीजचोरीप्रकरणी ६-७ जणांवर नागपूर वीज मंडळाच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर ६५ हजारांचा दंड लावला आहे. चोरी टाळयासाठी केबल लाईन टाकण्याचा चा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाºयांकडे दिला आहे.- विपूर बन्नवरेशहर अभियंता