शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-नागपूर, भुसावळ पॅसेंजर धावणार तरी कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:01 IST

अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकाहून तब्बल ४२ रेल्वे गाड्यांची धडधड सुरू आहे. हल्ली अमरावती ते वर्धा, भुसावळ ही मेमू रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही अमरावती ते नागपूर, भुसावळ, पॅसेंजर, इंटरसिटी अजून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याकडे लक्ष देत भुसावळ मध्य रेल्वे विभागाने तत्काळ  पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे विभागाने आता रेल्वे गाड्यांचा स्पेशल दर्जा काढून सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, केवळ एकच मेमू सुरू केल्याने पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार, असा प्रश्न आता प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकाहून तब्बल ४२ रेल्वे गाड्यांची धडधड सुरू आहे. हल्ली अमरावती ते वर्धा, भुसावळ ही मेमू रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही अमरावती ते नागपूर, भुसावळ, पॅसेंजर, इंटरसिटी अजून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याकडे लक्ष देत भुसावळ मध्य रेल्वे विभागाने तत्काळ  पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पॅसेंजरने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने याचा विचार होणे गरजेचे आहे.

केवळ मेमू झाली सुरू - अमरावती  रेल्वेस्थानकाहून अमरावती ते वर्धा, भुसावळ एकच मेमू सुरू आहे.- नागपूर ते अमरावती इंटरसिटी या गाड्या रेल्वे विभागाने सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

जनरल तिकीट बंदचसर्व रेल्वे गाड्या नियमित करण्यात आल्या असल्या तरी आरक्षणाची अट अजूनही कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य तिकिटांची विक्री अजूनही बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकिटांची खरेदी करावी लागत आहे.- कोरोनामुळे आधीच रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यातच स्पेशल ट्रेन सुरू झाल्या. मात्र, आता आरक्षणाची अट रद्द करण्याची मागणी होत आहे.

प्रवाशांच्या खिशाला झळ 

पॅसेंजर रेल्वे अजूनही सुरू न झाल्याने अपडाऊन करण्यास अडचण येते. परिणामी, वर्धा येथेच खोलीवर राहावे लागते. अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने खिशालाही चांगलीच झळ बसते.- प्रवीण कस्तुरे, प्रवासी.

रेल्वे विभागाने गाड्या नियमित जरी केल्या तरी आरक्षणाची अट कायम आहे. पॅसेंजर गाड्याही सुरू केलेल्या नाहीत, त्यामुळे अतिरिक्त पैसे मोजावे लागते. खासगी वाहनाने अपडाऊन करावे लागत आहे.- राजेश सपकाळे, प्रवासी

 

टॅग्स :railwayरेल्वे