शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख शेतकऱ्यांना १०९ कोटींची मदत केव्हा ?

By admin | Updated: September 7, 2016 00:13 IST

गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर केला.

 सोयाबीन, कापूस उत्पादक वाऱ्यावर : पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत नाहीगजानन मोहोड अमरावतीगतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर केला. या अनुसार ५० टक्के प्रमाणात विशेष मदत देण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील निकषपात्र १ लाख ९७ हजार ७०९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रूपयांची मदत अपेक्षित असताना शासनाने यंदाचा खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना एक छदामही दिलेला नाही. गतवर्षी जिल्ह्यातील पैसेवारी ५० पैशाच्या आत म्हणजे ४३ पैसे असल्याने व याविषयी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारल्याने शासनाने जिल्ह्यासह विदर्भातील ११ हजार ८३२ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र, केंद्राच्या एनडीआरएफच्या नवीन निकषाप्रमाणे अद्याप मदत दिलेली नाही. सोयाबीन उत्पादक संतप्तअमरावती : मात्र सोयाबीन व कपाशी पिकासाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीकविमा योजनेची मंडळनिहाय जाहीर रकमेच्या ५० टक्के प्रमाणात मदत करण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतला. यासाठी तालुकानिहाय शेतकऱ्यांची माहिती शासनाने २२ एप्रिल रोजी मागविली व याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ एप्रिल रोजी सर्व तहसीलदारांना सूचना देऊन निकषप्राप्त शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या. मात्र, विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आॅगस्ट महिन्यात तयार झाल्या. या अन्वये जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ८६१ शेतकऱ्यांनी २ लाख ३८ हजार ५१९ हजार हेक्टर सोयाबीन पिकासाठी व १९७ गावांतील १७११ शेतकऱ्यांनी ५९९७ शेतकऱ्यांनी कपाशी पिकासाठी विमा काढलेला नाही. या सर्व शेतकऱ्यांना विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात म्हणजे १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये शासनाकडे केली असताना दुष्काळाचे अनुदान अद्याप देण्यात आलेले नाही. यामुळे शेतकरी कमालीचे संतप्त झाले आहे. कपाशीसाठी ३९ लाखांची मागणीदर्यापूर व चिखलदरा तालुक्यात कपाशीसाठी पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत देण्यात येणार आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यातील १ हजार ७११ शेतकऱ्यांना ३१ लाख ५७ हजार ५३६ व चिखलदरा तालुक्यातील १३७ शेतकऱ्यांना ७ लाख ८६ हजार ६४४ रुपयांची अशी एकूण १ हजार ८४८ शेतकऱ्यांना ३९ लाख ४४ हजार १८१ रुपयांची मदत अद्याप देण्यात आलेली नाही. असा आहे विशेष मदतीचा शासनादेश अमरावती, नागपूर, औरंगाबाद व नाशिक विभागातील कापूस पीक तसेच अमरावती, नागपूर विभागातील सोयाबीन पिकांसाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात रक्कम शासन देणार आहे.