शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

झोपड्या तोडल्या, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाचे काय?

By admin | Updated: June 5, 2015 00:37 IST

आठवडी बाजार परिसरातील अतिक्रमणात असलेल्या गरिबांच्या पाच झोपड्या नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात काढून टाकल्या.

संदीप मानकर  दर्यापूरलोकमत विशेषआठवडी बाजार परिसरातील अतिक्रमणात असलेल्या गरिबांच्या पाच झोपड्या नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात काढून टाकल्या. गरिबांच्या या झोपड्यांवर नगरपालिकेने कारवाई केली. परंतु मुख्य रस्त्यावर असलेल्या विळख्यात असलेल्या अतिक्रमणाचे काय, असा सवाल दर्यापूरकर विचारत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक बसस्थानक चौक, रेल्वे गेटजवळ, अकोला रोड, मेन रोड आधी परिसरात अवैध अतिक्रमणाने थैमान घातले आहे. संपूर्ण दर्यापूर नगरीच अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. परंतु नगरपालिका या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. दर्यापूर, अकोट रस्ता हा मुख्य महामार्ग आहे. हजारो वाहने येथून रोज ये-जा करतात. किरकोळ व फळविक्रेत्यांनी येथे आपली दुकाने थाटली आहे. काही लोकांनी तर येथे चक्क आॅटो दुरुस्तीचे गॅरेज थाटले आहे. भर रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. त्यामुळे जळ वाहनांना त्रास होतो. आधीच तर रस्त्यांची रुंदी कमी आहे. त्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे ये-जा करणाऱ्यांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दर्यापूर शहराचे अतिक्रमण काढण्याचा मुद्दा अनेक वेळा चर्चेला येतो. पण नेमकी माशी कुठे शिंकते हेत कळत नाही. मुख्याधिकारी सुधाकर पाणझाडे यांनी यासंदर्भात अनेक वेळा बैठका घेतल्या. परंतु कधी पोलीस बंदोबस्त मिळत नाही. कधी नगरसेवकांचा विरोध अशा अनेक कारणांमुळे अतिक्रमण काढण्याची कारवाई होत नसल्याचे समजते. परंतु सुंदर शहर करण्याच्या दृष्टीने अतिक्रमण काढणे गरजेचे असल्याच्या भावना आहेत.नवनिर्वाचित अध्यक्षांकडून अपेक्षानुकतीच दर्यापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या वंदना राजगुरे निवडून आल्या. सुंदर दर्यापूर शहर करण्यासाठी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले अतिक्रमण ते काढतील का? असा प्रश्न दर्यापुरातील नागरिक विचारत आहेत. वंदना राजगुरे यांच्यासमोर अतिक्रमण काढण्याचे आव्हान आहे व लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे. उपविभागीय कार्यालय, पोलीस प्रशासन व नगरपालिका यांनी बैठक घेऊन संयुक्तरित्या कारवाई करणे गरजेचे आहे. चुकीच्या गतिरोधकामुळे मणक्यांच्या आजारात वाढनुकत्याच दर्यापूर नगरपालिकेने पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण केले. परंतु संस्कृती कलेक्शन ते नगरपालिकापर्यंत करण्यात आलेल्या या रस्त्यांवर तब्बल सात ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहे. हे गतिरोधक उंच व चुकीच्या पद्धतीने टाकले असल्याचे मत अनेक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. येथून ये-जा करणाऱ्या लोकांना या गतिरोधकामुळे मणक्याच्या आजारात वाढ झाल्याचे अनेकांनी सांगितले.एवढे गतिरोधक टाकण्याचे काम नसल्याचे अनेकांनी सांगितले.