शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 14, 2015 00:58 IST

पावसाने ७ दिवस दडी मारली खरी; मात्र यानंतर ४ आॅगस्टला सुरू झालेला पाऊस थांबायचे नाव नाही. १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे.

१० दिवसांपासून सतत पाऊस : कपाशी, तुरीला बाधकअमरावती : पावसाने ७ दिवस दडी मारली खरी; मात्र यानंतर ४ आॅगस्टला सुरू झालेला पाऊस थांबायचे नाव नाही. १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत, शेती पिकामध्ये पाणी साचले आहे, सर्वच धरणांची स्थिती ‘ओव्हरफ्लो’ आहे. १५ आॅगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शेती पिकासह सर्वच घटकांना बाधक असल्याने जिल्हावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून पावसाला सुरुवात झाली. यावेळी जिल्ह्यात १ जून ते ४ आॅगस्टपर्यंत केवळ ३०४.९ मि.मी. पावसाची नोंद होती. हा पाऊस जिल्ह्याच्या अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १४० मि.मी. कमी होता. सद्यस्थितीत ३१ आॅगस्टपर्यंत पावसाची अपेक्षित सरासरी ५१४.६ मि.मी. असताना ५५९ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील १० दिवसांत तब्बल २६० मि.मी. पाऊस जिल्ह्यात पडला आहे व यापैकी १४८.८ मि.मी. पाऊस ४ ते ५ आॅगस्ट या २४ तासांत पडला होता व जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. या अतीपावसाने नदी-नाल्याकाठची किमान ५ हजार हेक्टरमधील शेतीपिके खरडली आहे. शेतात तळे साचले आहेत. शेतातील जवरणी, निंदण-खुपणाची कामे खोळंबली आहेत. कपाशी व तूर पिकावर ‘आकस्मित मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने अगदी थोड्या पावसाने नदी-नाल्यांना पूर येत आहे. यामध्ये जीवितहानी व वित्तहानी होत आहे. अनेक गावांचा संपर्क तुटतो, वीजपुरवठा खंडित होतो, हे नव्याने संकट उद्भवत आहे. ग्रामीण भागातील रस्ते चिखलात बुजले आहेत, शहरातील रस्ते खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती उद्भवली आहे. प्रदीर्घ दडीनंतर हवाहवासा व दिलासा देणारा पाऊस आता शेती पिकाच्या मुळावर उठला असल्याने जिल्ह्यातील शेती पिकावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.१५ आॅगस्टपर्यंत सतर्कतेचा इशाराविदर्भात १३ ते १५ आॅगस्टपर्यंत ४८ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे नागपूर विमानतळ येथील हवामान खात्याने कळविले आहे. या अनुषंगाने सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांना दिला आहे. हा पाऊस १८ आॅगस्टपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.कमी दाबाचे क्षेत्र होताहेत तयारउत्तर, मध्य प्रदेश, बंगालचा उपसागर, उत्तर आंध्रप्रदेश आणि ओरीसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. सौराष्ट्र, कच्छ, दक्षिण छत्तीसगढ व लगतच्या विदर्भावर ३.१ कि. मी. उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. १० दिवसांत १० व्यक्तींसह १२ जनावरांचा मृत्यूसंततधार पावसामुळे जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून १३ आॅगस्ट या १० दिवसात १० व्यक्ती व १२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ व्यक्ती वीज पडून तर ६ व्यक्ती पुरात वाहले आहे. गुरांमध्ये २ बैल, ४ म्हशी, २ गाई व ४ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तीन हजार हेक्टरमधीलशेती पिकांचे नुकसानया १० दिवसांत झालेल्या पावसामुळे नदी-नाला काठावरील किमान ३ हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान तिवसा तालुक्यात आहे. साडेतीन हजार घरांची पडझड झाली, तर २० घरे पूर्णत: जमीनदोस्त झालीत.