शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात दरवर्षी ७ लाखांवर नागरिक पुराने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:53 IST

विभागातील ८० लहान-मोठ्या नदीनाल्यांमुळे ९४५ गावे प्रभावित होतात. यामध्ये मोठ्या ३४ नद्यांमुळे ५८४, तर लहान नद्यांमुळे ३६१ गावांचा समावेश आहे

गजानन मोहोडअमरावती : विभागातील ८० लहान-मोठ्या नदीनाल्यांमुळे ९४५ गावे प्रभावित होतात. यामध्ये मोठ्या ३४ नद्यांमुळे ५८४, तर लहान नद्यांमुळे ३६१ गावांचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये सात लाख २५ हजारांवर नागरिक बाधित झाल्याची नोंद आहे. यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी यंदा ३,०८८ तात्पुरते निवारे तयार आहेत, तसेच नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास पाचही जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मान्सूनपूर्वीच सज्ज झाले आहे.विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी पाचही जिल्हाधिकाºयांची बैठक बोलावून याविषयीचा आढावा घेतला. पावसाळ्यात येणाºया पुरामुळे विभागातील १९१ गावांचा संपर्क तुटतो. याविषयीच्या उपाययोजनांवर यावेळी मंथन करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक ८६ गावे बलडाणा जिल्ह्यातील आहेत. अमरावती ११, अकोला ६५, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील ५ गावांचा समावेश आहे. विभागात ९,२०० मीटर रोप बंडल, ५९५ लाईफ बॉईज, ८५७ लाईफ जॅकेट, ५ फायबर बोट व १४ रबर बोट उपलब्ध आहे. विभागात १८ वीज अटकाव यंत्र उपलब्ध आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ६ यवतमाळ, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येकी चार, तर अकोला जिल्ह्यात निरंक आहेत.अमरावती जिल्ह्यात ६८.०९ लाख, अकोला २२ लाख, यवतमाळ ५.१० लाख तर बुलडाणा जिल्ह्यात २५.९८ लाखांचा आपत्ती व्यवस्थापन निधी शिल्लक आहे. विभागीय स्तरावर महसूल उपायुक्तांची विभागीय नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्ष २४ बाय सात तास कार्यान्वित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. विभागात १,५३६ प्रशिक्षित मनुष्यबळनैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी विभागात १,५३६ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. यामध्ये शोध व बचाव पथकांत सर्वाधिक १,१२४,  प्राथमिक उपचार कक्षात १५०, हॅम रेडीओतज्ज्ञ १८, स्कुबा डायव्हर्स १२, मास्टे ट्रेनर्स २१० व अशासकीय संस्थांचे २२ कर्मचाºयांचा समावेश आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी विविध विभांगाकडे जबाबदारी सोपविण्यात आली तर या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक सेवांची देखभाल दुरूस्ती करण्यात आलेली आहे. आपदग्रस्तांचे स्त्थलांतर व त्याविषयीच्या नियोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी निर्देश दिलेत