अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत भयंकर घटना घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. भानखेडा फाट्यानजिकच्या जंगल परिसरात रविवारी एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला जंगलात फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पाच आरोपींनी पीडितेसह तिच्या मित्राला मारहाण केली. त्याला बांधून ठेवले आणि त्यानंतर अत्याचार केले.
शनिवारी (२८ मार्च) सायंकाळी १८ वर्षीय तरुणी तिच्या मित्रासोबत मोपेडने चांदूर रेल्वे रोडने फिरण्यास गेली होती. रात्री ८ च्या सुमारास तेथून परतत असताना भानखेडा फाट्याजवळ २५ ते ४६ वयोगटातील काही व्यक्तींनी त्यांना अडवले.
तरुणीने १२० रुपये दिले पण...
पाच जणांनी तरुणी आणि तिच्या मित्राला फरफटत रस्त्याशेजारील जंगलात नेले. तिथे आरोपींनी पैशांची मागणी करत तिच्या मित्राला बेदम मारहाण केली आणि त्याला बांधून ठेवले. पीडितेने जवळ असलेले १२० रुपये आरोपींना दिले, तर, पाचपैकी एकाने तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला.
धक्कादायक बाब म्हणजे, त्या आरोपीने या कृत्याचा व्हिडीओदेखील मोबाइलमध्ये चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे.
पाचपैकी दोघांनी त्या तरुणाची मोपेड रस्त्यापासून दूर नेली. घटनेची वाच्यता केल्यास काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दोघांनाही दिली. घटनेनंतर मोपेड व मोबाईल पिडितांना देऊन पाचही आरोपींनी तेथून पळ काढला.
गुन्ह्याचे गंभीर स्वरूप
पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्कार, लूट (दरोडा), बंदिस्त करून जीवे मारण्याची धमकी आणि खासगी व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
एकाने अत्याचार केला असला, तरी इतरांनी त्याला प्रवृत्त केल्याने आणि सहकार्य केल्याने यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविल्याची माहिती डीसीपी गणेश शिंदे यांनी दिली. पीडितेवर सध्या इर्विन रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांची थरारक मोहीम आणि अटक
घटनेनंतर पीडितेने आणि तिच्या मित्राने कसेबसे इर्विन रुग्णालय गाठले. शनिवारी रात्री ११:२० ते ११:३० च्या सुमारास ती माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसाच्या पथकांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी १२ तासांच्या आत पाच आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
सायंकाळी केले मेडिकल
दरम्यान याप्रकरणी रविवारी सकाळी ८.३६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपी हे २५, २८, ३१, ३४ व ४६ वर्षे वयोगटातील आहेत.
Web Summary : In Amravati, five men assaulted an 18-year-old college student after abducting her and her friend. The perpetrators filmed the crime and threatened the victims. Police swiftly arrested all five accused within 12 hours.
Web Summary : अमरावती में, पांच लोगों ने 18 वर्षीय कॉलेज छात्रा और उसके दोस्त का अपहरण करने के बाद उस पर हमला किया। अपराधियों ने अपराध का वीडियो बनाया और पीड़ितों को धमकी दी। पुलिस ने 12 घंटे के भीतर सभी पांच आरोपियों को गिरफ्तार कर लिया।