शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशीही पाणीपुरवठा बंदच

By admin | Updated: May 22, 2015 00:41 IST

परतवाडा शहरातील पाणीपुरवठा सोमवारपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नरेंद्र जावरे अचलपूरपरतवाडा शहरातील पाणीपुरवठा सोमवारपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनची जोडणी संबंधित अभियंत्याच्या अज्ञानाने जोडली गेली नाही. परिणामी परतवाडावासीयांना पाण्यासाठी वणवन भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.परतवाडा अचलपूर शहराला प्रस्तावित चंद्रभागा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी कंत्राट गोंडवाणा इंजिनिअरिंग या कंपनीला देण्यात आला. परंतु सदर कंपनीकडून मागील आठ वर्षांपासून कासवगतीने कार्य सुरू आहे. सोमवारी नागरिकांना कुठीलच सूचना न देता अचानक पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सलग चौथ्या दिवशी गुरुवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा खंडित होता. उन्हाळ्यात पाणीपुरवठा नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.पाईप लाईन जुळलीच नाहीपालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या आढावा बैठकीत परतवाडा-अचलपूर शहरातील विविध विकासात्मक कामांसोबत पाणीपुरवठा योजनेचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांचे पालकमंत्र्यांनी कान टोचले होते. त्यांची धास्ती घेत गोंडवाना इंनिनिअर कंपनीचे काही तरी काम दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला. नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनीसुध्दा या कंपनीच्या कामावर कुठलीच हरकत न घेता रान मोकळे सोडल्याचा प्रकार घडला. चंद्रभागा धरणातून आलेल्या पाईप लाईनची जोडणी स्थानीय पोस्ट आॅफीसनजीकच्या टाकीला करावयाची होती. या टाकीत अगोदर बोअरमधून पाणीपुरवठा केला जात होता. ती जोडणी तोडून नवीन जोडणीचे एकंदर हे काम होते. चंद्रभागा धरणातून आलेली पाईप लाईन जास्त व्यासाची आहे. थेट टाकीत पाणी सोडताना त्याचा प्रवाह अधिक असल्याने जोेडणी अयशस्वी ठरली. पूर्वी संबंधित मुख्य अभियंता कंपनीचा जबाबदार अधिकारी आदींची उपस्थिती आवश्यक होती. मात्र जबाबदार अभियंता बेपत्ता होते. वारंवार जोडणी निघून जात असल्याने पाणीपुरवठा झाला नाही.