शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आली जलसमृद्धी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:06 IST

Amravati News water नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावर ३८ नाला खोलीकरण व १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आल्याने समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्गाच्या कामाला वेग३८ नाला खोलीकरण, १० साठवण तलावाची निर्मिती

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावर ३८ नाला खोलीकरण व १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आल्याने समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या पाण्याचा मोठा लाभ मिळणार आहे.नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस हाय-वे या समृद्धी महामार्गाचे काम जानेवारी २०१९ पासून जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर अशा तीन तालुक्यात युद्धस्तरावर सुरू झालेले आहे. समृद्ध महामार्गाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या माती मुरुमासोबतच प्रशासनाच्या मृद व जलसंधारण विभागाशी सांगड घालण्यात आलेली आहे.

महामार्ग बांधकामासाठी राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत माती, मुरूम, दगड या साहित्याचा वापर एनसीसी कंपनी लिमिटेडने जलसंधारणाला २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरुवात केली. धामणगाव तालुक्यातील १२ नाला खोलीकरण व दोन साठवण तलाव, चांदूर तालुक्यातील पाच नाला खोलीकरण व एक साठवण तलाव तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील २१ नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून, त्यातील माती-मुरुम मार्गावर उपयोगात येत आहे. सात साठवण तलावांची निर्मिती झाली.

तीनही तालुक्यांत वाढली पाण्याची पातळीधामणगाव तालुक्यातील ६१.४०० मीटर, चांदुर रेल्वे तालुक्यात ९ हजार मीटर व नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ३० हजार ८१० मीटर अशी एकूण ९१ हजार २१० मीटर लांबीचे नाला खोलीकरण करण्यात आले. त्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नाला खोलीकरणाचा लाभ मिळाला. लगतच्या शेतीतील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नाला खोलीकरनामुळे साठवण तलावाची क्षमता ९६८.०० टीएमसीने वाढली आहे. या जलसंधारणाच्या कामांमधून ३ लाख ४१ हजार २५० ब्रास माती मुरूम उपलब्ध झाल्याने याचा वापर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी झाला आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग आता जलसमृद्धी मार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.समृद्धी महामार्गाच्या बाजूला नाला खोलीकरण व साठवण तलाव तयार करण्यात आले आहे. यात साठवणूक झालेल्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे. विशेषत: या भागातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.- गजानन पळसकर,कार्यकारी अभियंता, अमरावती

समृद्धी महामार्गाच्या कामाला गती आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या वेळेप्रमाणे हा मार्ग पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे या कामावर काही स्थानिक मजुरांनाही प्राधान्य देण्यात आलेले आहे.- नीरजकुमार,जनरल मॅनेजर, एनसीसी कंपनी

टॅग्स :Waterपाणी