शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी सर्कलमध्ये आता प्रभाग समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीला अधिक महत्त्व दिले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा प्रत्यक्ष नियोजनामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढावा, ग्रामपातळीवरील नावीन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव तालुकास्तरावर पाठविणे, प्रत्येक गावाच्या अडीअडचणींचे ग्राम स्तरावरच सोडवणूक व्हावी, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा, प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रभाग समिती नियुक्त केली आहे.

ठळक मुद्देसर्व गावांचा आराखडा होणार तयार : अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासाची ठरणार दिशा

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : ७३ व्या घटना दुरुस्तीनंतर संविधानातील अनुछेद २४३ जीप्रमाणे आता प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत प्रभाग समिती नियुक्त करून तालुक्यातील सर्वच गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतला आहे.राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीला अधिक महत्त्व दिले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा प्रत्यक्ष नियोजनामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढावा, ग्रामपातळीवरील नावीन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव तालुकास्तरावर पाठविणे, प्रत्येक गावाच्या अडीअडचणींचे ग्राम स्तरावरच सोडवणूक व्हावी, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा, प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रभाग समिती नियुक्त केली आहे. या समितीत ग्रामीण पाणीपुरवठा व परिसर स्वच्छता, जलसंधारण, ग्रामपंचायत, आरोग्य महिला व बाल कल्याण पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण, पशुसंवर्धन, समाजकल्याण अल्पबचत दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.अशी राहणार प्रभाग समितीप्रभाग समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य राहतील. यात पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पशूपर्यवेक्षक, शाखा अभियंता, केंद्रप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, सर्व पर्यवेक्षिका, विस्तार अधिकाºयांचा समावेश असेल. दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात समितीची सभा त्या प्रभागात होणार आहे.समितीला हे राहतील अधिकारगावखेड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अद्ययावत करणे, पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाईपलाईन गळती दुरुस्ती करणे, पाणी शुद्धीकरणाचा वापर, वैयक्तिक शौचालय, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प आराखडा तयार करणे, पाणीपट्टी विशेष घरपट्टी वसुली आढावा दर चार वर्षांनी कर आकारणीचा प्रस्ताव, अतिक्रमण हटविणे, लोकवर्गणी गोळा करणे, ग्रामपंचायत भवन इमारत उभारण्याचे नियोजन करणे, ग्राम अभियान जन्म-मृत्यूची नोंद, प्राथमिक शिक्षण कुटुंबकल्याण, पाणी नमुने तपासणी, मलेरिया, क्षयरोग प्रतिबंधक तपासणी, अंगणवाडी मुलांना नियमित आहाराबाबत तपासणी, गावात स्वच्छता, साक्षरता अभियान, गुरांचे शिबिर, गुरांची खावटी योजना, गावातील सर्व कुटुंबांना योजनांत सहभागी करणे, अल्पबचत उद्दिष्ट, बीपीएलधारक कुटुंबांचे सर्वेक्षण अशा विविध योजना आराखडा ही समिती तयार करणार आहे.तालुक्यातील चारही जि.प. सर्कलमध्ये प्रभाग समिती नियुक्त आहे. महिन्याच्या दुसºया आठवड्यात समितीची बैठक होईल. यात सर्व अधिकाºयांची उपस्थित अनिवार्य आहे. यातून गावविकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.- माया वानखडे, बीडीओ, पं.स.

टॅग्स :zpजिल्हा परिषद