शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
4
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
5
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
6
ह्रदयद्रावक! नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून आजोबांनी काढली रात्र; चाळीसगावमधील संतापजनक घटना
7
Adhik Maas 2026: अधिक मासात संकटमुक्तीसाठी करा 'ही' दत्तसेवा; मिळेल श्री दत्तगुरूंचा अखंड आशीर्वाद!
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातविरुद्ध दोषारोपपत्र; ४९ दिवसांपासून कोठडीत; १०५ साक्षीदारांकडे चौकशी
9
Sambit Patra : "२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
10
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
11
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
12
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
13
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
14
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
15
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
16
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
17
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
18
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
19
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
20
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरात उमेदवारांची मारामार

By admin | Updated: June 12, 2014 23:38 IST

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात दमदार उमेदवारांची मारामार आहे. नवेच्छुकांना त्यामुळे या मतदारसंघात मोठी संधी उपलब्ध आहे. नवागतांमध्ये दावेदारीसाठी सुरू झालेली

गणेश देशमुख - अमरावती
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात दमदार उमेदवारांची मारामार आहे. नवेच्छुकांना त्यामुळे या मतदारसंघात मोठी संधी उपलब्ध आहे. नवागतांमध्ये दावेदारीसाठी सुरू झालेली पराकोटीची चढाओढ नागरिकांसाठी मनोरंजनाचा विषय ठरला आहे.
दर्यापूरचे आमदार अभिजित अडसूळ यांचा निवडणुकीपूर्वी त्या मातीशी दुरान्वये संबंध नव्हता. वडिलांच्या खासदारकीमुळे अमरावती जिल्ह्याशी संपर्क आलेल्या अभिजित यांचे वास्तव्य मुंबईत. जसे ते निवडणुकीपूर्वी, तसेच ते निवडणुकीनंतरही! मोदींच्या लाटेचा लाभ त्यांचे पिताश्री आनंदराव अडसूळ यांना झाला; तथापि अभिजित यांना तो कितपत होणार याबाबत काळच काय ते सांगेल.
सन २००९ पासून अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात १९९० ते २००९ पर्यंत प्रकाश पाटील भारसाकळे यांनी राज्य केले. ते सतत चार वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. डिसेंबर २००६ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडून

काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राणे यांनी फोडलेल्या आमदारांमध्ये भारसाकळे यांचाही समावेश होता. शेवटच्या अडीच वर्षांचा आमदारकीचा त्यांचा कार्यकाळ काँग्रेसच्या तिकिटावरील होता. निसटता विजय त्यांना मिळाला होता. त्यानंतर राखीव

मतदारसंघाचे पहिले आमदार अभिजित हे ठरले. दावेदारांच्या चढाओढीचा लाभ आमदार अभिजित अडसूळ यांच्यासाठी जसा मागच्यावेळी लाभाचा मुद्दा होता तसाच तो यावेळीही लाभाचा मुद्दा ठरू शकतो.
शिवसेनेच्या या गडात काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची यादी मोठी आहे. श्रीराम नेहर, अमरावतीचे किशोर बोरकर, पक्षाच्या डॉक्टर सेलचे पदाधिकारी असलेले आकोटचे हृदयरोेगतज्ज्ञ कैलास जपसरे, युवक काँग्रेसचे भूषण खंडारे, अचलपूरचे नगराध्यक्ष

अरुण वानखडे या सर्वांना संधीची अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा स्थानिक चेहरा या मतदारसंघात नाही. लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांच्या नाकात दम आणणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत कौर-राणा यांची दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी आहे. नवनीत

दर्यापुरातून लढल्यास जिल्हाभरात दर्यापूर मतदारसंघ आकर्षणाचा विषय ठरेल. भाजपक्षाकडे या मतदारसंघात चेहरा नाही. सातत्याने मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे भाजपक्षाने तसा प्रयत्नच केला नाही. आज वेगळे लढण्याची वेळ आल्यास भाजपसमोर

पेचप्रसंग उभा ठाकेल.
भारिप-बहुजन महासंघ या जागेची मागणी करीत आहे. विष्णू कुऱ्हाडे यांची दावेदारी आहे. आरपीआयकडून रामेश्वर अभ्यंकर आणि बळवंत वानखडे ही दोन नावे चर्चेत आहेत. आरपीआयची भूमिका अद्याप निश्चित नाही.
मनसेसाठी गोपाल चंदन आणि अविनाश गायगोले हे प्रबळ दावेदार आहेत. लोकसभा निवडणूक लढविणारे गुणवंत देवपारे यांच्या नावाची बसपाकडून अधूनमधून चर्चा होते; तथापि त्यांचा मतदारसंघात संपर्क सुरू झालेला नसल्यामुळे बसपातर्फे दुसरे नाव

येण्याची शक्यता अधिक आहे.