शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीची वाट खडतरच !

By admin | Updated: June 10, 2016 23:59 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतल्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती महापालिकेला २५ ते ३० जून दरम्यान प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

३० जूनची डेडलाईन : सर्वसमावेशक, त्रुटीरहित प्रस्ताव पाठविण्याचे दिव्य अमरावती : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतल्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती महापालिकेला २५ ते ३० जून दरम्यान प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्यासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावा लागणार असून या प्रस्तावाला महासभेची मान्यता आवश्यक आहे. तथापि महापालिका यंत्रणा आणि संबंधित एजन्सीच्या कामाची गती पाहता स्मार्टसिटीची वाट खडतरच राहणार, अशी चिन्हे दिसत आहेत.स्मार्ट सिटीमध्ये जी शहरे निवडली गेली त्या शहरांनी दाखल केलेल्या प्रस्तावांचा अभ्यास आणि त्रुटीरहित ‘डीपीआर’ पाठविण्याचे आव्हान महापालिका यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. मात्र, ज्या तऱ्हेने ‘स्मार्टसिटी प्रकल्पाचे काम अपेक्षित आहे. ते होत नसल्याने अमरावती महापालिकेचा प्रस्ताव सर्वसमावेशक आणि निवडीसाठी पात्र होईलच, याबाबत लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित केली आहे. स्मार्टसिटीच्या प्रथम फेरीमध्ये अमरावती शहराचा समावेश न झाल्याने आता दुसऱ्या फेरीसाठी महापालिकेला फेरप्रस्ताव (डीपीआर) पाठवायचा आहे. महापालिकेच्या हाती केवळ पंधरवाडा शिल्लक आहे. या पंधरवाड्यात सर्वसमावेशक डीपीआर तयार करण्याचे दिव्य यंत्रणेला पेलावे लागणार आहे. स्मार्ट मोबालिटी ट्रान्सपोर्टसाठी ‘वॉल्टर पी.मूर’ या एजन्सीसोबत तर नेटवर्क सोल्यूशनसाठी ‘स्मार्ट टेक सोल्यूशन’ या पुणे स्थित एजन्सीसोबत पालिकेने ‘एमओयू’ केला आहे. यापैकी ‘वॉल्टर डी. मूर’ ही एजन्सी शहराचे सर्वेक्षण करीत असून त्यात पार्किंग, वाहतूक व्यवस्था व एकंदरीतच स्मार्ट सिटीच्या अनुशंगिक बाबी समाविष्ट राहतील. ही एजन्सी ‘स्मार्ट सिटी’ प्रस्तावाचे ‘ड्राफ्टिंग’ महापालिकेला करून देईल. ‘स्मार्टटेक सोल्यूशन’ ही एजन्सी ‘वायमॅक्स टेक्नॉलॉजी सिस्टिम’वर काम करीत आहे. ७५० एकर क्षेत्राचा पुनर्विकास आणि ३०० एकर क्षेत्रातील ग्रीनफिल्ड एरियाचा फेरप्रस्तावात अंतर्भाव केला जाणार आहे. एकंदरीतच फेरप्रस्ताव आणि एजन्सींसोबत करार करण्यास उशिर झाल्याने स्मार्टसिटीचा प्रस्ताव अत्युच्च दर्जाचा होईल का?, हा प्रश्न आहे. फेरप्रस्तावाच्या सर्वसमावेशकतेवरच शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड अवलंबून आहे.