शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात सुरक्षेसाठी ‘वॉकीटॉकी’

By admin | Updated: May 25, 2016 00:26 IST

कारागृहांच्या कारभारावर आजही ब्रिटिशकालीन पद्धतीचा पगडा असला तरी कैद्यांसाठीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक बदल करून अद्ययावत यंत्र सामग्रीची पूर्तता करण्यात आली आहे.

गणेश वासनिक अमरावतीकारागृहांच्या कारभारावर आजही ब्रिटिशकालीन पद्धतीचा पगडा असला तरी कैद्यांसाठीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक बदल करून अद्ययावत यंत्र सामग्रीची पूर्तता करण्यात आली आहे. त्यानुसार येथील मध्यवर्ती कारागृहात अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी ‘वॉकीटॉकी’चा वापर केला जात आहे. त्यामुळे आता एका टोकाहून दुसऱ्या टोकावरील सुरक्षा रक्षकांना एकमेकांशी संवाद साधणे सुकर झाले आहे. कारागृहातील कैद्यांची दिनचर्या ही ‘सुर्योदय ते सूर्यास्त’ अशी असते. मात्र, कारागृहात घडणाऱ्या अप्रिय घटना रोखण्यासाठी गृह विभागाकडून नानाविध उपाययोजना केल्या जातात. कारागृहांमध्ये मोबाईल आढळणे, नागपूर जेलब्रेक होणे, दारु, गांजा पोहोचणे याबाबी सुरक्षेसाठी घातक आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाने अंतर्गत, बाह्य सुरक्षेसाठी अद्ययावत सयंत्रांचा वापर सुरु केला आहे. येथील मध्यवर्ती कारागृहात आतापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे, रेडिओ मिर्ची, कैद्यांची आॅनलाईन मुलाखत, ई- प्रिझम, एका क्लिकवर बंद्यांना माहिती अशा विविध सुविधा सुरु करुन विदर्भात अग्रस्थानी राहण्याचा बहुमान पटकाविला आहे. कारागृहात मनुष्यबळाची वानावा ही नित्याचीच बाब असली तरी सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत सयंत्रांमुळे सुरक्षा यंत्रणा हाताळताना सुरक्षा रक्षकांना मदत होऊ लागली आहे. अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट, प्रसिद्ध खून खटले, मोका, टाडा आदी गुन्ह्यातील आरोपी जेरबंद आहेत. अंतर्गत सुरक्षेसाठी हे कारागृह मुंबई, येरवड्यानंतर गणले जाते. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेकडे गृहविभागाचे लक्ष राहाते. त्यामुळे अंतर्गत, बाह्य सुरक्षेसाठी आवश्यक बाबींचा पुरवठा केला जातो. सुरक्षेसाठी ‘वॉकीटॉकी’चा वापर केला जात असून त्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांना देखील वॉकीटॉकी देण्यात आले आहेत. तटरक्षकांना दुर्बिणीसह वॉकीटॉकी देखील अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांना संवाद साधणे सुकर झाले आहे. मुख्य प्रवेशद्वार, कार्यालय, दोन मनोरे, १६ बराकी, तटाला सुरक्षा देणाऱ्या रक्षकांना वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. वरिष्ठ तुरूंगाधिकारी नितीन क्षीरसागर जबाबदारी सांभाळत आहेत. तटाला वेढा : अंतर्गत, बाह्यसुरक्षेसाठी वापरबदलत्या काळानुसार कारागृहात सुरक्षेसाठी उपाययोजना के ल्या जात असल्याने सुरक्षा यंत्रणा हाताळणे सोयीचे होत आहे. कारागृहात २५ वॉकीटॉकी आल्या असून त्यांचा सुरक्षेच्या अनुशगाने वापर होत आहे. पोलीस प्रशासनाच्या धर्तीवर वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. हे एक चांगले पाऊल ठरेल.- जयंत नाईक,अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.