शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची तारीख अन् करप्रणाली निर्णयाची प्रतीक्षा

By admin | Updated: August 27, 2014 23:11 IST

महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख आणि स्थानिक संस्था कर (एलबीटी) याबाबत राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने अद्याप काहीच ठरविले नसल्याने महापालिका प्रशासन चिंतीत आहे.

अमरावती : महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख आणि स्थानिक संस्था कर (एलबीटी) याबाबत राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने अद्याप काहीच ठरविले नसल्याने महापालिका प्रशासन चिंतीत आहे. राजकारण, अर्थकारण या दोन्ही बाबींशी हा विषय निगडित असल्याने महापालिकेला शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.महापौरपदाची निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार हे जवळजवळ निश्चित असले तरी कोणत्या तारखेला ही निवडणूक घ्यावी, हा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागणार आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौरपदाची निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी महापौरपदाची निवडणूक होत असल्याने येथील राजकारण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते महापौरपदाच्या तारखेकडे लक्ष लावून आहेत. विद्यमान महापौर वंदना कंगाले यांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी महापौरपदाची निवडणूक आटोपणे महत्त्वाचे आहे. महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख केंव्हा येणार, या निर्णयाची दिवसागणिक प्रतीक्षा असताना एलबीटी किंवा जकात यापैकी कोणता कर महापालिकेत लागू करावा, याविषयी प्रशासनाला निर्णय घ्यायचा असून याबाबत शासनाने पत्र पाठविले नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिकांत एलबीटी की जकात हा निर्णय स्थानिक स्तरावर घ्यावा, असा निर्णय दिला. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर येथील व्यापाऱ्यांनी एलबीटी कराचा भरणा करताना हात रोखल्याने एलबीटीचे उत्पन्न ७५ टक्के माघारले. परिणामी महापालिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नगर विकास मंत्रालयाने महापालिकेत कोणत्या कराची अंमलबजावणी करावी, हा निर्णय शासनाला कळविण्याबाबतचे पत्र पाठविले तरच सर्वसाधारण सभेत निर्णय घेता येईल, अथवा हा निर्णय लांबणीवर पडेल, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.