बेलोरा वळण मार्गाला सुरू होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:08 IST2021-01-01T04:08:36+5:302021-01-01T04:08:36+5:30

------------------------ अकोला मार्गावर खड्ड्यांनी वाहन चालक त्रस्त अमरावती : अकोला राष्ट्रीय महामार्गावर बडनेरा ते लोणी या दरम्यान रस्त्यावर जागोजागी ...

Waiting for the Belora detour to begin | बेलोरा वळण मार्गाला सुरू होण्याची प्रतीक्षा

बेलोरा वळण मार्गाला सुरू होण्याची प्रतीक्षा

------------------------

अकोला मार्गावर खड्ड्यांनी वाहन चालक त्रस्त

अमरावती : अकोला राष्ट्रीय महामार्गावर बडनेरा ते लोणी या दरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना या मार्गावरून कसरत करावी लागत आहे. या मार्गावर खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

------------------------------

दुर्गापूर मार्गाची झाली चाळण

अमरावती : बडनेरा ते दुर्गापूर या दरम्यान रस्त्यावर मालवाहू वाहनांची मोठी गर्दी राहते. परंतु, या मार्गावर खड्डे पडले असल्याने जीव मुठीत घेऊन चालकांना वाहने चालवावी लागत आहे. या मार्गावर लोकवस्तीमुळे रस्त्यावर ये-जा नियमित आहे.

---------------------------

राजकमल चौकात रस्ते निर्मितीला वेग नाही

अमरावती : येथील राजकमल ते राजापेठ या दरम्यान सिमेंट रस्ते निर्मितीचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर नियमितपणे वाहतूक कोंडी होत असल्याचे वाहनचालक त्रस्त झाले आहे. रस्ते निर्मितीचे काम वेगाने करावे, अशी मागणी नागरिकांची आहे.

--------------------------

बांबू गार्डनमध्ये गर्दी वाढली

अमरावती : लॉकडाऊनमुळे बंद असलेले वनविभागाचे बांबू गार्डन गत आठवड्यापासून सुरू झाले आहे. अशातच शाळा, महाविद्यालये बंद असल्याने बांबू गार्डनमध्ये गर्दी वाढली आहे. बच्चे कंपनीसह कुटुंबीय मौजमजा करण्यासाठी बांबू गार्डनमध्ये येत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Waiting for the Belora detour to begin