शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

५२४ ग्रामपंचायतींच्या प्रशासकांवर गंडांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:01 IST

कोरोनाचा उद्रेक राज्यातील काही जिल्ह्यांत सुरू झाला. निवडणूक सभा-बैठकींमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच आयोगाने आहे त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक थांबविली. यानंतर या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.

ठळक मुद्दे अध्यादेशानुसार कार्यवाही : विस्तार अधिकाऱ्यांऐवजी पदाधिकाऱ्यांकडे जाणार का धुरा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या प्रशासक तथा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांवर सोमवारच्या अध्यादेशाने गंडांतर आले आहे. अधिकाऱ्यांऐवजी शासनाला योग्य वाटेल त्या व्यक्तीची निवड करण्यात येणार असल्याने इच्छुक सरसावले आहेत.जिल्ह्यात एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आयोगाने आहे त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत रद्द केल्याने या ठिकाणी प्रशासकपदी संबंधित पंचायत समितीचे विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे अनेक ग्रामपंचायतींचा प्रभार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रशासक हा ‘बारा गावचा कारभारी’ ठरल्याने कामकाजाला मर्यादा आल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीची प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपासून सुरु करण्यात आली होती. यानुसार ३० मार्चला मतदानाची प्रक्रिया अपेक्षित होती. म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच निवडीची पहिला सभा होऊन नवीन पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सुरू झाला असता. यादरम्यान कोरोनाचा उद्रेक राज्यातील काही जिल्ह्यांत सुरू झाला. निवडणूक सभा-बैठकींमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच आयोगाने आहे त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक थांबविली. यानंतर या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्याजिल्ह्यात निवडणूक रखडलेल्या ५२४ ग्रामपंचायतींमध्ये पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अमरावती तालुक्यात ४६, भातकुली ३४, नांदगाव खंडेश्वर ४४, चांदूर रेल्वे २८, धामणगाव रेल्वे ५३, तिवसा २७, मोर्शी ३९, वरूड ४१, अचलपूर ४०, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ३४, चांदूर बाजार ४१, धारणी ३२ व चिखलदरा तालुक्यात १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.अध्यादेशामध्ये योग्य व्यक्ती असा उल्लेख असला तरी स्पष्टता नाही. ग्रामपंचायत अधिनियमानुसार विस्तार अधिकाºयांपेक्षा कमी दर्जाचा अधिकारी नको हे स्पष्ट आहे.- दिलीप मानकरडेप्युटी सीइओ (पंचायत)

टॅग्स :zpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत