video! Youth congress worker came on petrol pump on a bicycle-horse in Amravati | अनोखा Video! पेट्रोल पंपावर सायकल-घोड्यावरून आले, LPG सिलिंडर पकडायला पैलवान

अनोखा Video! पेट्रोल पंपावर सायकल-घोड्यावरून आले, LPG सिलिंडर पकडायला पैलवान

अमरावती: पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडरच्या (Petrol, Diesel, LPG Price hike) दरवाढीविरोधात सोमवारी युवक काँग्रेसने येथील राजकमल चौक येथून घोडे सवारी आंदोलन केले यावेळी मोदी सरकारच्या वाढत्या महागाई  धोरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर देशमुख जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. (Youth Congress protest Against Petrol, Diesel, LPG Price hike.)

यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोड्यावर स्वार होत व सायकली वर बसून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला. यावेळी मालवीय चौक चौक येथील पेट्रोल पंपासमोर मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत जनतेचे लक्ष वेधले. महापालिका प्रवेशद्वारावरही घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलकांनी यानंतर पेट्रोल पंपावर मोर्चा वळविला. लग्नातील नटलेल्या घोड्यावरून आणि सायकलवरून काँग्रेस कार्यकर्ते आले होते. त्यांच्यासोबत एक सिलिंडर दोन्ही हाताने उंचावून धरणारा हट्टाकट्टा कार्यकर्ता होता. एवढा वेळ हा सिलिंडर उचलून धरणे देखील या कार्यकर्त्याला अवजडल्यासारखे झाले होते. तरीही त्याने तो सिलिंडर दोन हातांनी डोक्याच्याही वर उचलून धरला होता. 

 ( Video - मनीष तसरे,अमरावती)

Web Title: video! Youth congress worker came on petrol pump on a bicycle-horse in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.