शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक परिस्थितीने घेतला एकाच कुटुंबात दोघांचा बळी

By admin | Updated: June 25, 2014 00:08 IST

मुलाने एक वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर वैफल्यग्रस्त पित्यानेही सोमवारच्या रात्री दर्यापुरच्या आठवडी बाजारात लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पनोरा

दर्यापूर : मुलाने एक वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर वैफल्यग्रस्त पित्यानेही सोमवारच्या रात्री दर्यापुरच्या आठवडी बाजारात लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पनोरा गावात हळहळ व्यक्त होत आहे.दर्यापूर तालुक्यातील पनोरा येथील बाबुराव नागोजी वानखडे (७५) यांना तेजराव नावाचा मुलगा होता. तो आॅटो चालक होता. परंतु गतवर्षी तेजरावने परिस्थितीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर परिवाराचा चरितार्थ चालविण्याची जबाबदारी वडिल बाबुराव नागोजी वानखडे यांच्यावर आली. त्यांनी तेजरावच्या मुलांचा सांभाळ केला. वानखडे यांच्याकडे सात एकर शेती आहे. परंतु सततची नापिकीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. सेवा सहकारी सोसायटीचे देखिल त्यांच्यावर कर्ज होते. यंदाही पाऊस लांबणीवर पडल्याने याहीवर्षी हीच स्थिती राहील असे त्यांना वाटत होते.कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्याने त्यांनी सोमवारी रात्री दर्यापुरातील बैलबाजारात अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी नागरिकांच्या लक्षात आला. घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना देण्यात आली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांना त्यांच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात माझ्यावर बँकेचे कर्ज असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. मागील वर्षी त्यांचा मुलगा तेजराव यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूरावजी वानखडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती तालुक्यातील पनोरा येथे कळताच गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.