शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय विभाग जोरात

By admin | Updated: January 8, 2017 00:10 IST

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने अलीकडे कात टाकली असून हा विभाग मोकाट श्वान व इतर गुरांना अटकाव घालण्यात यशस्वी ठरला आहे.

५६२१ श्वानांचे निर्बिजिकरण : मोकाट जनावरांना अटकावअमरावती : महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने अलीकडे कात टाकली असून हा विभाग मोकाट श्वान व इतर गुरांना अटकाव घालण्यात यशस्वी ठरला आहे. महापालिकेने एप्रिल २०१६ ते ५ जानेवारी २०१७ या कालावधीत १११२ पेक्षा अधिक मोकाट जनावरांना बंदिस्त करून संबंधित पशुपालकांकडून ३ लाख ७२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय विभागांतर्गत येणाऱ्या श्वान उत्पत्ती नियंत्रण उपक्रमाअंतर्गत १९ मे २०१६ ते ५ जानेवारी २०१७ या कालावधीत ५६ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले. नर श्वान व मादी श्वानाच्या निर्बिजिकरण शस्त्रक्रियेचे गुणोत्तर ३५-६५ असे आहे. शहरातील कुठल्याही रस्त्यावर मोकाट जनावरे दिसू नयेत, अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. (प्रतिनिधी)२५ जानेवारी 'डेडलाईन'महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पशू नोंदणी प्रक्रियेला वेग आला आहे. ७ दिवसांत २४९ वराहांची नोंदणी करण्यात आली असून संबंधित वराहधारकांकडून ७,४०० नोंदणी शुल्क घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नोंदणीकृत वराहांचे पालन त्यांच्या मालकामार्फत करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. पाळीव श्वान, गाई, म्हशी, घोडे, शेळी, मेंढी इत्यादींचा परवाना वजा नोंदणी करण्याच्या सूचना वजा आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी २५ जानेवारी ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. - तर फौजदारी कारवाईनोंदणीकृत नसलेल्या जनावरांना मालक नाही, असे गृहित धरून अशा जनावरांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना आयुक्त हेमंत पवार यांनी दिल्या आहेत. विनापरवानगी पशुपालन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची सूचना पशूवैद्यकीय विभागाला आयुक्तांकडून करण्यात आली आहे. मोकाट जनावरांवर अंकुश लावण्यात आला आहे. पशुंच्या नोंदणीला व्यापक प्रतिसाद मिळत असून, पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुंची महापालिकेत नोंदणी करून घ्यावी.- सुधीर गावंडे, पशुशल्यचिकित्सक, महापालिका