सावित्री बाई फुले जयंतीनिमित्त गाडगेबाबा मार्केटमध्ये विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:29 IST2021-01-13T04:29:28+5:302021-01-13T04:29:28+5:30

स्वाभिमानी वस्तीस्तर संघातर्फे आयोजन, चांदूर रेल्वे : सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून रविवारी महिला आर्थिक विकास महामंडळ, दिशा लोकसंचालित ...

Various events at Gadge Baba Market on the occasion of Savitri Bai Phule Jayanti | सावित्री बाई फुले जयंतीनिमित्त गाडगेबाबा मार्केटमध्ये विविध कार्यक्रम

सावित्री बाई फुले जयंतीनिमित्त गाडगेबाबा मार्केटमध्ये विविध कार्यक्रम

स्वाभिमानी वस्तीस्तर संघातर्फे आयोजन,

चांदूर रेल्वे : सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून रविवारी महिला आर्थिक विकास महामंडळ, दिशा लोकसंचालित साधन केंद्र, दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्वाभिमानी वस्तीस्तर संघ यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन शहरातील गाडगेबाबा मार्केटमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनिता ढोकणे होत्या. प्रास्ताविक क्षेत्रीय समन्वयक अश्विनी मढाईत यांनी केले. यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेऊन सावित्रीबाईंच्या संघर्षाला उजाळा दिला.

शीतल सदाफळे, सुनीता बांते, डॉ. सुषमा खंडार, डिंपल जोल्हे, आशा मरसकोल्हे, सुषमा स्थूल, मेंढे, शालिनी राऊत, मेश्राम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. संचालन ममता डाफ यांनी केले. सुनीता बांते यांनी सुंदर अशी एकांकिका यावेळी सादर केली. शीतल सदाकडे यांनी सावित्रीबाईंवर ओवी सादर केली. रांगोळी स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला तसेच वेशभूषा स्पर्धाही आयोजित केली होती. या कार्यक्रमात मास्कचे महिलांना वितरण करण्यात आले.

Web Title: Various events at Gadge Baba Market on the occasion of Savitri Bai Phule Jayanti