शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाड विचार मंचने रणनीती आखली

By admin | Updated: June 22, 2014 23:48 IST

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करुन नवे राजकीय व्यासपीठ स्थापन करण्याचे धाडस दाखविणाऱ्या संजय खोडके यांच्या वऱ्हाड विचार मंचचा मेळावा रविवारी येथील संत ज्ञानेश्वर

अमरावती : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करुन नवे राजकीय व्यासपीठ स्थापन करण्याचे धाडस दाखविणाऱ्या संजय खोडके यांच्या वऱ्हाड विचार मंचचा मेळावा रविवारी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडला. या मेळाव्यात खोडके समर्थकांनी एकच गर्दी केली होती.लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणून संजय खोडके यांनी पक्षाची भूमिका समर्थपणे सांभाळली; मात्र राष्ट्रवादीने आ. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी जाहीर करताच पक्षनेतृत्वाच्या या निर्णयाविरोधात संजय खोडके यांनी एल्गार पुकारला. काहीही झाले तरी राणा यांचे काम करणार नाही, ही स्पष्ट भूमिका घेतली. परिणामी खोडके यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव या पदावरुन हटविण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या काळात संजय खोडके यांनी वऱ्हाड विचार मंच या नावाने वेगळी संघटना काढून नवनीत राणा यांच्या पराभवाची मोहीम फत्ते केली. लोकसभा निवडणुकीनंतर आता खोडके यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. वऱ्हाड विचार मंचची जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर करुन खोडकेंनी जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण सुरु केल्याचे स्पष्ट होते. बडनेरा व अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने हा मेळावा आयोजित केल्याचे निदर्शनास आले.मेळाव्याच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जवंजाळ होते. यावेळी मंचावर सुलभा खोडके, संजय खोडके, बाळासाहेब गौरखेडे, भाऊराव मेश्राम, अण्णासाहेब दिवे, कांतीभाई पटेल, मनीष बजाज, उमाळे काका, हमीद शद्दा, जस्सो जुम्मा नंदावाले, हाजी हारुण सुपारीवाला, तैय्यब अली, मधुकर सव्वालाखे, पुरुषोत्तम गावंडे, सुधाकर विरुळकर, प्रभाकर गुल्हाणे, अयुब खान, काळमेघ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)