शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी वनपरिक्षेत्रात एकाचवेळी मादीसह चार बिबट्यांचे प्रत्यक्ष दर्शन

By admin | Updated: May 24, 2015 00:42 IST

ृवडाळी वनपरिक्षेत्रात सात ते आठ बिबट असल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे. आतापर्यंत एकावेळी दोन किंवा तीन बिबट ...

खळबळ : वनविभाग सतर्क, सात-आठ बिबट असल्याची पुष्टीवैभव बाबरेकर अमरावतीृवडाळी वनपरिक्षेत्रात सात ते आठ बिबट असल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे. आतापर्यंत एकावेळी दोन किंवा तीन बिबट जंगलात आढळून आलेत. मात्र, शुक्रवारी एकाचवेळी मादीसह चार बिबटांचे प्रत्यक्ष दर्शन वनअधिकाऱ्याला झाले, हे विशेष.अमरावती वनविभागातील उपवनसरंक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे यांनी वनसंवर्धनाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे वडाळी परिक्षेत्रातील जंगलाची समृध्दी वाढली असून पोषक वातावरणामुळे वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. नागरिकांना जंगलात प्रवेशबंदी करुन जनावरांच्या चराईवर अंकुश लावण्याचा प्रयत्नदेखील केला जात आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात यापूर्वी अनेकदा बिबट आढळून आले. काही दिवसांपूर्वी एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्यांचे अस्तित्व सिध्द झाले तर या जंगलात पट्टेदार वाघांचे वास्तव्य असल्याचेही पुरावे आहेत. वनविभागाने नागरिकांना सावध राहण्यासाठी अलर्ट केले आहे.पोहरा जंगलात केली गाय फस्तवडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा जंगलात गायीची शिकार झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. गाईची शिकार वाघाने केली की बिबट्याने, हे कळू शकले नाही. पोहरा जंगलातील वनमजूर शालिकराम राठोड यांची गाय जंगलात चरत असताना वाघ किंवा बिबट्याने तिची शिकार केली असावी, असा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वन्यप्राण्यांनी गाईला फस्त केल्याचे यादरम्यान आढळून आले. पोहऱ्यात गाईची शिकार झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्या वन्यप्राण्याने शिकार केली, हे स्पष्ट झालेले नाही. वडाळीतही चार बिबट एकाचवेळी आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे. जंगलाशेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांना ‘अलर्ट’ करण्यात आले आहे. - निनू सोमराज, उपवनसंरक्षक वनविभाग, अमरावती .