अवकाळी; रब्बीला पोषक, तुरीला बाधक

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 27, 2023 02:24 PM2023-11-27T14:24:20+5:302023-11-27T14:24:38+5:30

आठ तासात सरासरी १३.८ मिमी पाऊस, कापूस भिजला, तुरीवर अळ्यांचा धोका

untimely rain in Amravati; Nutritious for Rabi, cons for Tur crop | अवकाळी; रब्बीला पोषक, तुरीला बाधक

अवकाळी; रब्बीला पोषक, तुरीला बाधक

अमरावती : दोन-अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. आठ तासात सरासरी १३.८ मिमी नोंद झालेली आहे. हा अवकाळी पाऊस हरभऱ्यासाठी पोषक ठरला तर वेचणी राहिलेल्या शेतातला कापूस ओला झाला. शिवाय ढगाळ वातावरण व पावसामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता वाढली भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

वातावरण बदलाने दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात कमी आलेली आहे. अशातच रविवारी रात्री एक ते दीडपासून पावसाला सुरुवात झाली. सोमवारी दुपारी १२ पर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. बाजार समिती दोन दिवसांपासून बंद आहे व पावसाळी वातावरणामुळे मंगळवारी बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले आहे.

Web Title: untimely rain in Amravati; Nutritious for Rabi, cons for Tur crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.