शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आप्पा गेडाम यांचे सदस्यत्व रद्द करा

By admin | Updated: October 11, 2016 00:17 IST

मोर्शी नगरपरिषदेचे मुुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणारे येथील ...

नगरपालिकांमध्ये काम बंद : सीईओंना मारहाण प्रकरण अमरावती: मोर्शी नगरपरिषदेचे मुुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणारे येथील स्वीकृ त नगरसेवक जितेंद्र ऊर्फ आप्पा गेडाम यांचे सदस्यत्व रद्द करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नगपरिषदामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. याबाबत १० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन सोपवून कारवाईची मागणी रेटून धरली आहे.मुख्याधिकारी महेश वाघमोडे कर्मचाऱ्यांसोबत शनिवारी चर्चा करीत असताना स्वीकृत नगरसेवक आप्पा गेडाम हे नगरसेवक सहकाऱ्यांसोबत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिरले. त्यांनी निवडणुकीसंदर्भात व एलएडी बल्बच्या निविदेबाबत चर्चा करीत असताना सीओंसोबत बाचाबाची झाली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सोबतच कार्यालयातील सामानाची फेकाफेक केल्याची तक्रार मुख्याधिकारी वाघमोडे यांनी मोर्शी पोलिसात केली आहे. त्यानुसार याप्रकरणी आप्पा गेडाम यांना पोलिसांनी अटक केली. मात्र दिवसेंदिवस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार वाढत आहे. या घटनांमुळे शासकीय कामे करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात घेता मोर्शी नगरपरिषदेचे स्वीकृ त नगरसेवक आप्पा गेडाम यांचे सदसत्व रद्द करून त्याच्या कठोर कारवाईची मागणी नगरपरिषदामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी देवेंद्र निकोसे, शेखर चव्हाण, अमोल ठोले, प्रशांत खोंडे, सय्यद मुबीन, प्रमोद खराटे, पुंडलिक कठाळे, शेख नाजीम अ. लतीफ, अब्दुल नासिर अब्दुल रशिद, प्रल्हाद दाभाडे व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.