शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ परिसर वायफायने जोडणार

By admin | Updated: April 3, 2017 00:06 IST

विद्यापीठ परिसरात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ आणि रिलायन्स-जीओ इन्फोकॉम लि. मुंबई या कंपनीशी शनिवारी करार झाला.

कुलगुरुंचा पुढाकार : रिलायन्स-जीओशी करारअमरावती : विद्यापीठ परिसरात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ आणि रिलायन्स-जीओ इन्फोकॉम लि. मुंबई या कंपनीशी शनिवारी करार झाला. कुलगरू मुरलीधर चांदेकर यांच्या उपस्थितीत विद्यापीठातर्फे कुलसचिव अजय देशमुख व जीओ कंपनीतर्फे उपाध्यक्ष बालसुब्रमण्यम अय्यर यांनी स्वाक्षऱ्या केल्यात. या करारांतर्गत विद्यापीठ परिसरात विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक व अधिकारी वाय-फायद्वारे मोफत डाटा वापरू शकतील. या करारांतर्गत २० एम.बी. डाटा दर दिवसी उपभोक्त्यास मोफत उपलब्ध असणार आहे. ज्यांचे थ्रीजी व टुजी मोबाईल हॅन्डसेट आहे, त्यांनाही हा डाटा वापरता येणार असल्यामुळे सर्वजण इंटरनेटने जोडले जातील. विद्यापीठ परिसरासह विद्यापीठाशी संलग्नित अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशीम या जिल्ह्यातील संलग्नित सर्व महाविद्यालयांना त्यांचा परिसर जीओ वायफायने मोफत जोडता येणार आहे. त्या महाविद्यालय व परिसरातील विद्यार्थी आणि सर्व शिक्षक, कर्मचारी यांना २० एम.बी. इंटरनेट डाटा प्रतिदिवस उपलब्ध असणार आहे.कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने ही मोफत सुविधा विद्यापीठ परिसरात सर्वांकरीता लवकरच सुरु होत आहे. अन्य महाविद्यालयांनाही संधीअमरावती : याशिवाय विद्यापीठ परिक्षेत्र असलेल्या अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशीम या जिल्ह्यातील महाविद्यालयांना ही सुविधा घ्यावयाची असल्यास त्यांना घेता येईल. याबाबत महितीकरिता विद्यापीठाने केलेल्या कराराची प्रत विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. प्राचार्यांना याबाबत माहिती जाणून घेता येईल. तत्कालीन बीसीयूडी संचालक राजेश जयपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली या करारासाठी समिती गठित करण्यात आली होती. कराराप्रसंगी दिनेशकुमार जोशी, संजय डुडुल, विलास नांदूरकर, रामरतन जावळे, जीओ व्यवस्थापक प्राण पांडा, संदीप त्रिपाठी, आकाश पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)