शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्ग लोकार्पणात पालकमंत्री, खासदारांना डावलले

By admin | Updated: October 26, 2015 00:25 IST

बहुप्रतीक्षित नवाथे रेल्वे भुयारी मार्गाचा लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या थाट्यात पार पडला.

अमरावती : बहुप्रतीक्षित नवाथे रेल्वे भुयारी मार्गाचा लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या थाट्यात पार पडला. मात्र, या सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरुन पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ गायब असल्याचे दिसून आले. तर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले आ. सुनील देशमुख, महापौर चरणजित कौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार अनुपस्थित होते. या सोहळ्यात प्रमुख लोकप्रतिनिधी नसल्याबाबतची चर्चा जोरदार रंगली.नवाथे रेल्वे भुयारी मार्ग निर्मितीसाठी मोर्चे, आंदोलने करण्यात आली. हा भुयारी मार्ग निर्मितीपूर्वी रेल्वे रुळ ओलांडून नागरिकांना येजा करावे लागत होते. मात्र हा प्रकार जीवघेणा ठरत असल्यामुळे भुयारी मार्ग निर्माण करण्यासाठी शासन प्रशासन स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात आले. या मार्गाच्या निर्मितीसाठी सुमारे १२.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्यामुळे महापालिकेने हा निधी उपलब्ध करुन दिला. सोहळ्याला  या नेत्यांची हजेरीनवाथे रेल्वे भुयारी मार्गाच्या लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याप्रसंगी मंचावर आ. रवी राणा, काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, नगरसेवक दिंगबर डहाके, दिनेश बूब, नितीन देशमुख, वनीता तायडे, नितीन मोहोड, मुन्ना मिश्रा, मुन्ना राठोड, सुनील काळे आदी उपस्थित होते.ंरेल्वे भुयारी मार्गाचा लोकार्पण सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका मिळाली नाही. एवढेच नव्हे तर रविवारीे हा सोहळा असल्याची माहितीदेखील नव्हती. कार्यक्रमाची रितसर माहिती मिळाली असती तर नक्कीच उपस्थित राहिले असते. - चरणजितकौर नंदा, महापौर, महापालिका.पालकमंत्र्याची तारीख मिळाली नाही तर खासदारांना बोलावण्याचा प्रश्नच येत नाही. हा निधी महापालिकेने खर्च केला आहे. नवाथे रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असल्याने तो नागरिकांच्या सेवेत दाखल व्हावा, यासाठी लोकार्पण सोहळा घेण्यात आला. नगरसेवकांच्या पुढाकाराने हा मार्ग पुर्णत्वास आला आहे.- दिगंबर डहाके, नगरसेवक, नवाथे प्रभाग.