शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

हलाखीच्या परिस्थितीतून झाले उमेश न्यायाधीश

By admin | Updated: March 14, 2016 00:12 IST

परिस्थिती हलाखीची असताना सर्व समस्यांवर मात करून शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या उमेश भास्कर पेठे ...

मुलाखत : गुरुजनांचे मार्गदर्शन सार्थकसंदीप मानकर अमरावतीपरिस्थिती हलाखीची असताना सर्व समस्यांवर मात करून शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या उमेश भास्कर पेठे या विद्यार्थ्याने न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर ही परीक्षा उत्तीर्ण करून गरूडझेप घेतली आहे. उमेश यांनी येथील डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून एलएलबीची डिग्री प्राप्त केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी या परीक्षेचा निकाल १० मार्च रोजी जाहीर झाला असून उमेश पेठे हे या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील तोंगलापूर या १२० लोकसंख्येच्या गावात अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात उमेशचा जन्म झाला. त्याचा मोठा भाऊ पोलीस म्हणून कार्यरत आहे. उमेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पिंपळखुटा येथून झाले. माध्यमिकचे शिक्षण जी.के. खापरे विद्यालय थूगाव येथून पूर्ण केले. परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांना शाळेपर्यंत पायी जावे लागत होते. पदवीपर्यंतचे शिक्षण जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदूरबाजार येथून पूर्ण केले. सन २००५ मध्ये वडिलाचे निधन झाल्याने कौटुंबिक परिस्थितीतून सावरून त्यांनी सन २००७ मध्ये एलएलबीची पदवी प्राप्त केली. मागील आठ वर्षांपासून ते अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करीत असून आतापर्यंत त्यांनी चारवेळी जेएमएफसीच्या परीक्षा दिल्यात. त्यांना सन २०१५ च्या परीक्षेत यश प्राप्त झाले. उमेश सांगतो, स्वत:सोबत जर आपण प्रामाणिक राहिलो व अभ्यासात सातत्य ठेवल्यासच यश पदरी पडते. वकिलीमध्ये माझे सिनियर्स राजेंद्र तायडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. शिक्षण घेत असताना प्रकाश दाभाडे यांच्यासारखे गुरू लाभले व त्यांनी मला न्यायाधीश होण्याकरिता वेळोवेळी मार्गदर्शन केले. न्यायाधीश होणे हे आपल्या आयुष्यातील सर्वोच्च स्वप्न असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्याचे आपले स्वप्न गुरुजनांच्या मार्गदर्शनाने पूर्ण झाल्याचेही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.